Jalgaon News : जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू; पोहण्याचा मोह जिवावर बेतला

Death News
Death Newsesakal

Jalgaon News : सुट्टीचा दिवस असल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) या तरुणाचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

शहरातील जोशी पेठेतील बागवान वाड्यातील रहिवासी सलमान बागवान फळ विक्री करीत होता.

रविवारी (ता. १८) फळ विक्री बंद असल्याने तो दुपारी चारच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेला. (Youth drowns in swimming pool temptation to swim overwhelming Jalgaon News)

त्या ठिकाणी पोहत असताना, त्याला जलतरण तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ जलतरण तलावातील सुरक्षारक्षकांना बोलावून, सलमानला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सलमानला मृत घोषित केले.

जिल्हा रुग्णालयात जोशी पेठ व बागवान वाड्यातील सलमानच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. मृत सलमानच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Jalgaon Election News : भाजप लोकसभा उमेदवारीची भाकरी फिरविणार का?

मृत्यूचे कारण अस्पष्ट

मृत सलमान बागवान याच्या मृत्यूबाबत त्याचे कुटुंब व नातेवाइकांनी तरण तलाव नियंत्रकांवर आरोप केले असून, रात्री जिल्हापेठ पोलिसांत गर्दी केली होती. पोलिसांनी घडल्या प्रकाराबाबत चौकशीचे आश्वासन दिले असून, तरण तलावचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत केल्यावर नेमका काय प्रकार घडला, हे स्पष्ट होणार आहे.

वन-डे तिकीटावर गर्दी

जिल्हा क्रीडा संकुलाच्या तरण तलावावर शंभर रुपये तासाने पोहणाऱ्यांची प्रचंड गर्दी उसळते. वास्तविक शंभर रुपये देणाऱ्या तरुणाला पोहता येते, की नाही याची कुठलीच खातरजमा संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात येत नसल्यानेच सलमान बागवान याचा मृत्यू ओढवल्याचे समजते.

सुरक्षारक्षकांची निष्काळजी

तरण तलावावर प्रशिक्षकांसह पाच ते सहा सुरक्षारक्षक अपेक्षित आहेत. ते सर्व तरण तलावात असल्यास अशा परकारच्या घटना घडणार नाहीत. मात्र, तरण तलावावर अशा कुठल्याच उपाययोजना न केल्याचे समजते.

Death News
Jalgaon News : विवाहितेने दिला अविकसित सयामी जुळ्यांना जन्म ; GMC मध्ये महिलेला मिळाला शस्त्रक्रियेद्वारे दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com