Jalgaon : पालिकांच्या अंतिम प्रभागरचनेला मंजुरी; आरक्षण सोडत जाहीर होणार

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या (Municipalities) प्रभागरचनेला (Ward Composition) विभागीय आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. या दहा पालिकांचे आरक्षण सोडतीचा (Reservation draw) कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. (Approval of final ward composition of 10 Municipalities Jalgaon News)

जिल्ह्यात भुसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, पारोळा, एरंडोल, वरणगाव, भडगाव या १५ पालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर २६३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. ‘अ’ आणि ‘ब’ वर्गाच्या नगरपालिकांच्या हरकतींवर राज्य निवडणूक आयोगाकडे, तर ‘क’ वर्ग पालिकांच्या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार होती. यात ‘क’ वर्ग असलेल्या पालिकांची सुनावणी होऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्यातील दहा पालिकांच्या अंतिम प्रभागरचनेला मंजुरी दिली आहे. यात पारोळा, एरंडोल, धरणगाव, यावल, रावेर, सावदा, फैजपूर, नशिराबाद, वरणगाव आणि भडगाव या दहा पालिकांचा समावेश आहे. आता या दहा पालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत १५ पालिकांमध्ये एकूण ५३ सदस्य संख्या वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Jalgaon Municipal Corporation
तहसिलदार उतरले रस्त्यावर; महसूल विभाग ‘ॲक्शन मोड’वर

‘अ’, ‘ब’ पालिकांचा निर्णय राखीव

जिल्ह्यात भुसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आणि चोपडा या ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात येतात. त्यामुळे त्यांच्या प्रभागरचनेला राज्य निवडणूक आयोग मंजुरी देते. दरम्यान, आज अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असली, तरी पाच पालिकांचा निर्णय आयोग स्तरावर राखीव असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
कॅरी बॅग कारखान्याचे गोदामच केले ‘सील’; महापालिका आयुक्तांची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com