पिंप्राळा पुलाच्या ‘आर्म’चा नकाशा बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

पिंप्राळा पुलाच्या ‘आर्म’चा नकाशा बदलणार

जळगाव : पिंप्राळा उड्डाण पुलाच्या पिंप्राळ्याकडे जाण्यासाठी ‘आर्म’ रस्त्याच्या जागा भूसंपादनात अडचणी निर्माण झाल्याने पुलाच्या ‘आर्म’च्या नकाशात थोडा बदल करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी (ता. २३) बैठक घेण्यात येणार आहे.

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, पुलाच्या पिंप्राळ्याकडे जाण्यासाठी वळण रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पिंप्राळा रेल्वे गेटजवळील खासगी जागा भूसंपादित करण्यात येणार आहे. मात्र, ही जागा भूसंपादन केल्यावरही विशेष चढण रस्त्यासाठी मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे पुलाच्या मुळ नकाशात थोडा बदल करणे गरजेचे झाले आहे. या पुलाच्या नकाशात आवश्‍यक तो किरकोळ बदल करून तो नकाशा रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेतर्फे निर्णय घेण्यात येणार असून, यासंदर्भात सोमवार (ता. २३) बैठक होणार आहे. महापालिका आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, उपमहपौर कुलभूषण पाटील तसेच अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: जळगाव महापालिका आयुक्तांकडून रस्त्यावर कर्मचाऱ्यांची हजेरी; 4 निलंबित

''पिंप्राळा उड्डाणपुलाच्या ‘आर्म’ रस्त्यासाठी जागा भूसंपादित करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे पुलाला काही अडचणी येत आहे. पुलाच्या नकाशात किरकोळ बदल करून तो रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.'' - कुलभूषण पाटील, उपमहापौर

हेही वाचा: जळगाव जिल्ह्याच्या पाणी पातळीत सरासरी दीड मीटरची घट

Web Title: Arm Road Change Of The Pimprala Bridge Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonBridge