
जळगाव जिल्ह्याच्या पाणी पातळीत सरासरी दीड मीटरची घट
जळगाव : शहरासह जिल्ह्यात यंदा झालेली १२० टक्के पाऊस, अनेक वेळा झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी जानेवारी २०२२ मध्ये एक ते चार मीटरने उंचावली होती. आता मात्र अति उष्णतेमुळे, अनेक ठिकाणी बोअरींग करून पाणी उपसा सुरू असल्याने पाणी पातळीत जानेवारी ते एप्रिल चार महिन्यात सरासरी दीड ते दोन मीटरची घट झाली आहे. जमिनीतील पाण्याचा उपसाचे प्रमाण कमी न झाल्याचे भविष्यात जमिनीतील पाणी साठे संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या पाच वर्षात एवढी पाणी पातळी यंदा उचविण्याची पहिलीच वेळ होती. पाणी पातळी उंचावल्याने तीव्र उन्हाळ्यात जिल्ह्यात काही गावे वगळता कोठेही पाणी टंचाई भासली नाही.
जामनेर, चाळीसगाव तालुक्यातील काही गावे वगळता जिल्हावासीय पाणी टंचाईपासून दूरच आहेत. यावल तालुक्यातील पाणी पातळीत जानेवारीत घट झाली होती. मात्र मार्चमधील सर्वेक्षणात पाणी पातळी वाढल्याचे दिसून आले.
हेही वाचा: शेतीच्या वादात काका-पुतण्यामध्ये हाणामारी; अभियंता पुतण्याचा मृत्यू
जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाने मागील महिन्यात जिल्ह्यातील ८१ ठिकाणच्या विहिरीवर जलपातळी सर्वेक्षण केले. त्यात काही ठिकाणी पाणी पातळी उंचावली तर काही तालुक्यात किमान एक ते दोन मीटरने पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेने जिल्ह्यातील १७८ ठिकाणच्या विहिरीची पाणी पातळी मोजली. त्यात सर्वात कमी पाणी पातळी ३.९० मिटर असल्याचे आढळले. सर्वात जास्त पाणी पातळी यावल तालुक्यात २४.२५ मिटर झाल्याचे आढळून आले.
भूजल सर्व्हेक्षण विभागातर्फे वर्षभरात जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर या चार महिन्यात भूजल सर्व्हेक्षण केले जाते. जिल्ह्यातील १७८ ठिकाणच्या विहिरीवर सर्व्हेक्षण केले जाते. त्यात पाणी पातळी उंचावली किंवा घटली आहे याची माहिती मिळते. अशी माहिती भूजल विभागातर्फे देण्यात आली.
तालुका निहाय पाणी पातळी अशी
तालुका- निरीक्षण विहिरी- जानेवारी२०२२ ची पाणीपातळी- एप्रिलमधील पातळी
मुक्ताईनगर--११--८.६४--१०.१९
रावेर--१०--११.९६--१७.५८
भुसावळ--७--५.४०--८.५२
बोदवड--६--४.८८--१०
यावल--७--२२.०२--२४.२५
जामनेर--२४--४.३८--६.७६
जळगाव--१५--११.३३--१३.४९
धरणगाव--७--४.८४--६.८६
एरंडोल--४--२.६८--३.९०
चोपडा--१४--१०.४०--१३.०७
अमळनेर--१४--३.६१--७.५८--१.३४
पारोळा--१६--३.१४--५.०७--१.७८
पाचोरा--१४--३.२२--५.६४
भडगाव--८--३.०३--४.४१
चाळीसगाव--२१--३.६९--५.४८
हेही वाचा: जळगाव शहरात विजेचा लपंडाव; महावितरण कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त
Web Title: Water Level In Jalgaon District Decreased Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..