Jalgaon Crime : हळदीत धक्का मारल्याच्या कारणावरुन सशस्त्र हल्ला

Jalgaon Crime : हळदीत धक्का मारल्याच्या कारणावरुन सशस्त्र हल्ला
esakal

Jalgaon News : औरंगाबाद रस्त्यावरील कुसुंबा गावातील पंडित शेनफडू कोळी (वय ४३) यांच्या पुतण्या गणेश कोळी याचा शोध घेत कुसुंब्यातील काही तरुण आणि जैनाबाद येथील ग्रुप-१५ चे काही सशस्त्र गुंडांनी हातात तलवार-चॉपर, चाकू लाठ्या काठ्या घेऊन पंडित कोळी यांच्या घरावर हल्ला चढवून तुफान दगडफेक केली. ही घटना मंगळवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास घडली. (Armed attack over dispute over dancing in Haldi Jalgaon news)

धीरज कोळी, छोटू कोळी, भय्या कोळी, अतुल पाटील व ग्रुप-१५ चे आठ ते दहा जण दुचाकीवर आले. महिला व लहान मुले असताना, या टोळक्याने घरावर दगडफेक केली व हातात तलवारी घेऊन घरात प्रवेश केला.

‘हळदीच्या कार्यक्रमात तुमचा पुतण्या गणेशने गोंधळ घातला असून, आम्ही त्याला जिवंत सोडणार नाहीत’, ‘तुम्हालाही मारून टाकू’, असे धमकावले. याबाबत पंडित कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अनिस शेख तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime : हळदीत धक्का मारल्याच्या कारणावरुन सशस्त्र हल्ला
Nashik News : कोब्राने केला तरुणाच्या ओठांनाच दंश...!

सिनेस्टाईल दहशत

कुसुंब्यातील अमोल निकम याच्या हळदीनिमित्त सोमवारी (ता. ८) नाचत असताना, जैनाबादच्या ग्रुप-१५च्या म्होरक्याला धक्का लागला.

धक्का मारल्यावरून कुसुंब्यातील ग्रामस्थांशी वाद होऊन गोंधळ उडाला होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धीरज कोळी याने कुसुंब्यातील गणेशला फोन करून धमकाले. ‘तुला गावात येऊन मारू’, असे सांगून थेट आठ ते दहा दुचाकींवरून सिनेस्टाईल गावात शिरून दहशत माजवली.

Jalgaon Crime : हळदीत धक्का मारल्याच्या कारणावरुन सशस्त्र हल्ला
Jalgaon Crime News : शिष्यवृत्तीत नापास करण्याचे धमकावून विद्यार्थिनीवर अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com