Jalgaon Corporator Protest : भाजप नगरसेवकांचे साखळी उपोषण केवळ ढोंगबाजी : अशोक लाडवंजारी

Jalgaon Ashok Ladvanjari News
Jalgaon Ashok Ladvanjari Newsesakal

Jalgaon Corporator Protest : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शहरातील समस्यांवर सुरू केले साखळी उपोषण केवळ ढोंगबाजी आहे, तसेच आयुक्तांची बदलीच्या मागणीचेही नाटक आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे केला. (Ashok Ladvanjari Allegations on corporator protest in jalgaon news)

आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला पाटील, माजी नगरसेवक सुनील महाजन, इब्राहीम तडवी आदी उपस्थित होते.

श्री. लाडवंजाारी म्हणाले, की आयुक्तांच्या बदलीसाठी भाजपला आंदोलन करण्याची गरज आहे का? त्यांची राज्यात सत्ता आहे. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. पालकममंत्री गुलाबराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्‍वासातील आहेत. या मंत्र्यांनी सांगितले, तरी त्यांची बदली होऊ शकते.

बदलीच करावयाची असेल, महासभेत ठराव करावा व तो शासनाकडे पाठवावा. जनतेने भाजपला बहुमत देऊन सत्ता दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Ashok Ladvanjari News
Jalgaon Corporator Protest : डॉ. अश्‍विन सोनवणेंच्या साखळी उपोषणला सर्व पक्षीय नगरसेवकांचा प्रतिसाद

मात्र, ती त्यांनी टिकवली नाही. पाच वर्षांत शहराचा कोणताही विकास केला नाही. आता भाजपचे नगरसेवकच म्हणतात विकास झालेला नाही. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्याचा या नगरसेवकांचा प्रयत्न आहे.

निधी गेला कुठे?

जळगावच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणल्याची घोषणा भाजपचे मंत्री व आमदारांनी केली आहे. मग मंत्र्यांनी आणलेला निधी गेला कुठे, याची आता चौकशी करण्याची गरज आहे. ४२ कोटींतून कामे करण्यासाठी नियुक्त केलेला मक्तेदार कुणाचा आहे? त्याने कामे का केली नाहीत? याचीही माहिती घ्यावी.

त्याच्या कारवाई करण्याबाबत नगरसेवक कधीही बोलले नाहीत. आता त्यांची मुदत संपण्यासाठी केवळ एक महिनाच राहिल्याने त्यांची ओरड सुरू झाली आहे. त्यांना खरोखरच आयुक्तांची बदली करावयाची असेल, तर एक महासभा होईल. त्यात त्यांनी हा प्रस्ताव आणावा, अन्यथा साखळी उपोषण करून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Jalgaon Ashok Ladvanjari News
Jalgaon News : सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा अविश्‍वाचा प्रथमच प्रस्ताव; नगरसेवकांच्या मनातील असंतोष उफाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com