Latest Marathi News | जळगाव : शिवाजीनगर पुलाचे डांबरीकरण वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon shivaji nagar bridge

जळगाव : शिवाजीनगर पुलाचे डांबरीकरण वेगात

जळगाव : पावसाने उसंत घेतली अन्‌ शिवाजीनगर पुलाच्या अंतिम टप्प्याच्या कामाचे भाग्यही उजळले. आज(ता.२८)पासून पुलाच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. तर पथदिवे बसविण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेस प्रतिसाद मिळाला असून त्यावरही लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

हेही वाचा: जळगाव महापालिका परिसर ‘भंगार मुक्त’; बॅनरचे ग्रहण अखेर सुटले

शिवाजीनगर पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे जळगाव शहरातील शिवाजीनगर भागासह ग्रामीण भागातील नागरिकांचेही हाल होत आहेत. पुलाचे काम त्वरित करण्यात यावेत, यासाठी नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली आहेत. त्यानंतरही प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. परंतु पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे नागरिकांना अधिकच त्रास होवू लागल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुकारला होता. त्यानंतर मात्र जिल्हा प्रशासन व महामार्ग विभागाने दखल घेतली व कामे वेगात सुरू झाली आहेत.

डांबरीकरणास प्रारंभ

पूल सुरू होण्यासाठी डांबरीकरण महत्वाचे आहे. गेले काही दिवस पाऊस असल्यामुळे त्याचे काम होवू शकत नव्हते. परंतु गुरुवारी पावसाने उघडीप दिली तसेच ऊन पडल्यामुळे सकाळपासूनच डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आला. शिवाजीनगर भागाकडील रस्त्यापासून या डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. मशिनव्दारे डांबरीकरणाचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसात डांबरीकरण पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Viral : कबूल है! लग्नसोहळ्यानंतर नवरदेव शौचालयातूनच फरार

पथदिव्यासाठी निविदा प्राप्त

पुलावर वाहतूक सुरू करण्यापूर्वी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. महामार्ग विभागाकडे पुलाचे काम असले तरी पथदिवे मात्र महापालिकेतर्फे बसविण्यात येणार आहेत. महापालिकेतर्फे त्याच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मक्तेदारांनी भरलेल्या निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. लवकर त्या निविदा खुल्या करण्यात येतील आणि तातडीने त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

डांबरीकरणानंतर दुचाकीसाठी वाहतूक

पुलाचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर दुचाकी वाहनासाठी वाहतूक खुली करण्यात येणार आहे. मात्र रात्रीच्या वेळी अंधाराचा धोका असल्याने रात्री पथदिवे बसविल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महामार्ग विभागाचे अधिकारी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

''पुलाच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसात काम पूर्ण करून दुचाकी वाहनांसाठी वाहतूक सुरू होवू शकते.'' - श्रीराम खटोड, संचालक, श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर जळगाव

हेही वाचा: विद्यापीठ घेईल विशेष परीक्षा..! विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा

''पूलावर पथदिव्यांसाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात आल्या आहेत. मक्तेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. लवकरच त्या खुल्या करून काम करण्याचे आदेश दिले जातील.'' - एम. जी. गिरगावकर, शहर अभियंता, महामालिका जळगाव.

''पुलाच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. आता त्यावरून दुचाकी वाहतूक सुरू होवू शकते, परंतु याबाबतचा निर्णय डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष पुलाची पाहणी करून घेतील.'' - सुभाष राऊत, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.

Web Title: Asphalting Work Of Jalgaon Shivaji Nagar Bridge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..