Latest Marathi News | पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

जळगाव : शहरातील मेहरूण नाल्याजवळ ५५ वर्षीय वृद्धावर मटण कापण्याच्या सूऱ्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. त्याच्या मुलासही बेदम मारहाण करण्यात आली. दोघेही पिता-पुत्राला मेहरुण येथे माहेरी असलेल्या सुनेच्या नातेवाइकांनी बोलावल्याचे जखमींनी माहिती दिली.

जखमी जफर अब्दुल रहिम खाटीक (वय ५५, रा.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलगा फैसल जफर खाटीक याचा विवाह तांबापुरामधील तरुणीसेाबत जानेवारी महिन्यात झाला होता. मुलगी विवाहानंतर काही दिवस चांगली राहिल्यावर माहेरी निघून आली. (Assault on father and son beaten him Injured alleged that the father in law had Fraud jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

गेल्या चार महिन्यांपासून ती माहेरीच आहे. सासरच्या मंडळींनी फोन करून सांगितले, की मुलगी नांदायला तयार आहे, म्हणून जफर खाटीक व त्यांचा मुलगा फैसल तिला घेण्यासाठी जळगावला आले होते.

मात्र, मुलीच्या माहेरीच्या मंडळींनी वाद उकरून काढला. आम्ही परत जात होतो. त्याच वेळेस मेहरुणच्या नाल्याजवळ आमच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. मटण कापण्याच्या सुऱ्याने झालेल्या हल्ल्यात जफर खाटीक गंभीर जखमी झाले.

मुलगा फैसल मदतीसाठी याचना करीत हेाता. फैसलच्या वडीलांवर आरीफ अजीज खाटीक, शकील, अकिला, जावेद, हारुन आणि शोएब नबी खाटीक यांनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

टॅग्स :JalgaoncrimeattackBeating