उधार चिकन न दिल्याने खाटिकावर हल्ला

Attack
Attackesakal

जळगाव : कानळदा येथील एका मद्यपीने चिकन विक्रेत्याला उधार चिकन मागितले, त्याने उधार चिकन दिले नाही म्हणून त्याला दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केले. याबाबत तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Attack
दारुच्या नशेत मित्रावरच कोयत्याने हल्ला

कानळदा (ता. जळगाव) येथील मनुदेवी रस्त्यावरच समसोद्दिन रज्जाक खाटीक (वय ५२) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. गावातील खन्ना सोपान कोळी आणि गोलू सोपान कोळी असे दोघे रविवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास दारूच्या नशेत त्यांच्या दुकानावर आले. त्यांनी समसोद्दिन खाटीक याच्याकडे उधार चिकन मागितले. यावर खाटीक यांनी उधार चिकन देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने खन्ना कोळी आणि गोलू कोळी यांनी खाटीक यांना बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.

Attack
प्रेम संबंधावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

जखमी समसोद्दिन खाटीक यांनी रात्री दहाला जळगाव गाठत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित खन्ना कोळी आणि गोलू कोळी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सतीष हारनोळ तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com