Jalgaon : विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; संशयितास 5 वर्षे सश्रम कारवास

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन शाळकरी विद्यार्थिनी लघुशंकेसाठी गेल्या असता, संशयितांनी दोघींना गाठत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीने चावा घेत पळ काढला, तर दुसरी त्याच्या तावडीत सापडली.

तिच्याशी अंगलट करून अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास जिल्‍हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. विशाल ऊर्फ डिगंबर अशोक जाधव-कोळी (वय २०) असे आरेापीचे नाव आहे.

मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहिवद येथील माध्यमिक विद्यालयात १६ फेब्रुवारी २०१६ ला दुपारी तीनच्या सुमारास स्वच्छतागृहात संशयित दडून बसला होता. पीडिता तिच्या मैत्रीणीसह लघुशंकेसाठी गेली असता, विशाल ऊर्फ डिगंबर अशोक जाधव याने दोन्ही मुलींचे हात धरले. (Attempted harassment of a student 5 years rigorous imprisonment for suspect Jalgaon Crime News)

Crime News
Jalgaon : 'हरहर महादेव चित्रपट' संभाजी ब्रिगेडने बंद पाडला

एकीने त्याच्या हातास चावा घेत पळ काढल्याने ती वाचली. मात्र, दुसऱ्या पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न करीत असताना, पहिल्या मुलीने वेळ न दवडता शिक्षकांना बोलावून आणले व संशयिताच्या तावडीतून तिची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. घडलेला प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांना कळविल्यानंतर पीडितेच्या आजोबांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून भादंवि कलम ३५४, ३७६ सह ५११, पोक्सोचे कलम-८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितांनी मांडली कैफियत

गुन्ह्यात पीडिता व तिची मैत्रीण दोघांनी सहा वर्षांपूर्वी शाळेच्या स्वच्छगढहात घडलेला घटनाक्रम जसाच्या तसा न्यायालयात आपल्या भाषेत सादर केला. पीडितेची सुटका करणाऱ्या शिक्षकांनीही अचूकपणे साक्ष नोंदविली.

वेळेत दोषारोप दाखल

गुन्ह्याचा तपास वेळेत पूर्ण करून तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. आर. सातव यांनी दोषारोपपत्र सादर केले. खटल्याची सुनावणी विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्यासमोर झाली. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात दोन्ही पीडिता व शिक्षकांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Crime News
Crime Update : जिल्‍हा रुग्णालयात विवाहितेचा विनयभंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com