esakal | Jalgaon | सरकारविरोधी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पाटील

जळगाव : सरकारविरोधी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : देशात शेतकरी प्रश्नावर सरकारच्या विरोधात जी काही आंदोलने होत आहेत, ती चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांच्या मोर्चात पाठीमागून गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतोय, हे कृत्य करणारा मंत्र्यांचा मुलगा पाच-सहा दिवस सापडत नाही, सापडल्यानंतर त्याला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत ठेवले जाते. देशातील शेतकऱ्यांविरोधात इतकी मोठी कृती झाल्या नंतरदेखील देशाच्या प्रमुखांना ना खंत, ना खेद, ना दुःख होते. यातून कोणती प्रवृत्ती देशात राज्य करते आहे, अभ्यासण्याची गरज असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

येथील बाजार समिती आवारात मंगळवारी (ता. १२) झालेल्या धनगर, ठेलारी समाज मेळाव्याप्रसंगी मंत्री जयंत पाटील बोलत होते. मेळाव्यास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा: "येत्या काळात महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडणार"

मंत्री पाटील म्हणाले, की केंद्रीय तपास यंत्रणांचा बेसुमार वापर करण्यात येत आहे. या यंत्रणादेखील पातळी सोडून कारवाया करत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या अधिकारी नव्हे तर बीजेपीचे नेते चालवत आहेत, असे वाटत असून, राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र चालविले जात आहे. हल्ली दररोज टीव्हीवर धाडी टाकल्याच्या बातम्या दिसत आहेत, मात्र यातून काय निष्पन्न होते हे मात्र सांगितले जात नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आतापर्यंत दहा वेळा धाड टाकली, मात्र आधीच्या धाडींमध्ये काय सापडले आणि आता काय आढळून आले याचा कुठलाही खुलासा केला जात नाही. हे केवळ सरकारमधील मंत्र्यांना व सरकारला बदनाम करण्यासाठीच केले जात असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला.

loading image
go to top