Jalgaon News : दिवाळी झाली, आता ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीकडे लक्ष

Cotton
Cotton esakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात ‘सीसीआय’च्या अधिपत्याखाली बारा ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास जिनर्स तयार आहेत. मात्र ‘सीसीआय’च परवानगी देत नाही. यामुळे ‘सीसीआय’ची केंद्र सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

दिवाळीनंतर कापूस खरेदी सुरू करू, असे ‘सीसीआय’ने म्हटले होते. मात्र अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने शेतकरी कापूस दराबाबत चिंताग्रस्त आहे.(Attention on cotton purchase of CCI jalgaon news)

कापसाला सात हजारांपर्यंत मिळत असलेल्या दरामुळे ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रे दिवाळीनंतर सुरू होते. मात्र ‘सीसीआय’ने जिल्ह्यात ज्या ठिकाणी केंद्रे सुरू करणार आहेत, तेथे मुंबई फायर नियंत्रण बेार्डाच्या परवानगीची अट घातली आहे. यामुळे ‘सीसीआय’ची खरेदी दिवाळीनंतरही रखडणार आहे.

‘सीसीआय’ने जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या. संबंधित जिनिंग चालकांना नियमावलीही दिली. यंदा इतर नियम सर्वांना मान्य आहेत. मात्र जळगावऐवजी मुंबई फायर नियंत्रण बोर्डाची ‘एनओसी’ची अट योग्य नाही.

या परवानगीला खर्चही आठ लाखांपर्यंत आहे. गेल्या वर्षीपर्यंत जळगाव फायर नियंत्रण बोर्डाची परवानगी चालत होती. आता मात्र मुंबई फायर नियंत्रण बोर्डाची परवानगी घ्यीव लागत आहे. ती खर्चिक व वेळखाऊ आहे. त्यामुळे ही अट रद्द करून जळगाव फायर नियंत्रण बोर्डाची ‘एनओसी’ लागू केली, तरच जळगाव जिल्ह्यात ‘सीसीआय’ची कापूस खरेदी आम्ही सुरू करू, असे खरेदीदारांचे म्हणणे आहे.

अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरिपातील कोरडवाहूचा कापूस आला नाही. जो आला आहे, तो बागायती क्षेत्रातील आहे. त्यात माईच्शर (ओल) आहे. व्यापारी कापसाला सात ते सात हजार दोनशेपर्यंत दर देत आहेत, तरीही हवा तसा कापूस विक्रीस येत नाही.

Cotton
Jalgaon News : अमळनेर आगाराला 40 लाखांचे उत्पन्न; प्रवाशांची एसटीला पसंती

व्यापाऱ्यांकडून जर कापसाचा दर सात हजारांच्या खाली आला, तरच ‘सीसीआय’ केंद्रे सुरू करणार आहे. जिल्ह्यात अकरा केंद्रे प्रस्तावित

आहेत. त्यात रावेर, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, पहूर, शेंदूर्णी, जळगाव, आव्हाणे, चोपडा, बोदवड, भुसावळ येथे केंद्र सुरू होणार आहेत.

‘अल् निनो’मुळे यंदा पाऊस लांबला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. जुलैत चांगला पाऊस झाला तरी ऑगस्टमध्ये ओढ दिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील कापसासह इतर पिकांची वाढ खुंटली. सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला.

पावसाअभावी अद्याप कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला बोंडे फुटलेली नाहीत. बागायती क्षेत्रातील कापसाचे उत्पादन बाजारात आले आहे. शेतकऱ्यांची या कापसाला चांगल्या दराची अपेक्षा आहे. त्यामुळे कापूस बाजारात येत नाही.

Cotton
Jalgaon News : ‘विनोद पाटील अमर रहे...’च्या घोषणांनी परिसर दणाणला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ‘सीसीआय’ कापूस खरेदीस टाळाटाळ करीत आहे. ‘सीसीआय’ने कापूस खरेदी जानेवारीत सुरू केली तर कपाशीचा दर्जा खालावेल. तसेच ‘सीसीआय’च्या अनेक अटी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच पैसे मिळत नाही. आतापर्यंत एक तरी ‘सीसीआय’चे केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ‘सीसीआय’च्या काहीच चालचाली दिसत नाही.

Cotton
Jalgaon News : भारत कुपोषणमुक्त करण्यावर तज्ज्ञांचे विचारमंथन; दोनदिवसीय प्रशिक्षण वर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com