Jalgaon News : महापालिका सभागृह होणार ‘डिजिटल’; 5 कोटींची तरतूद

Mayor Jayshree Mahajan, Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad and architect Neeraj Mantri while presenting the plan of the auditorium.
Mayor Jayshree Mahajan, Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad and architect Neeraj Mantri while presenting the plan of the auditorium. esakal
Updated on

Jalgaon News : महापालिकेच्या १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृह आता संपूर्ण डिजिटल करण्यात येणार आहे. त्यात तब्बल १०० नगरसेवकांच्या बसण्याच्या सुविधेसह अत्याधुनिक यंत्रणा असेल.

त्यासाठी पाच कोटींची तरतूद केली असून, आज वास्तुविशारद नीरज मंत्री यांनी आराखडा सादर केला. त्याला मंजुरी देण्यात आली. निविदा काढून सप्टेंबरमध्ये कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात नूतनीकरण आराखडा मंजुरीसाठी बैठक झाली. (auditorium on second floor of Municipal Corporation will now be completely digitalized jalgaon news)

उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अश्‍विन सोनवणे, गटनेते राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, वास्तुविशारद मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले, की महासभेत सभागृह नूतनीकरणाचा ठराव मंजूर केला होता. त्यासाठी पाच कोटी रुपये सीएसआर फंडातून खर्च करण्यात येतील.

महापालिकेत सद्यस्थितीत ७५ नगरसेवक बसण्याची सुविधा आहे. आगामी काळात प्रभाग वाढीसह नगरसेवकांची संख्या वाढण्याचे लक्षात घेऊन तब्बल १०० नगरसेवक बसण्याची सुविधा करण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor Jayshree Mahajan, Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad and architect Neeraj Mantri while presenting the plan of the auditorium.
Central Railway : तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम युद्धपातळीवर; मनमाड-भुसावळ विभागातील गाड्यांचा प्रवास होणार सुखकर

अत्याधुनिक यंत्रणा

संपूर्ण सभागृहात अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या टेबलावर स्वतंत्र ध्वनिक्षेपक, सभागृहात डिजिटल स्क्रीन असेल. सेंट्रल वातानुकूलित यंत्रणा, तसेच नगरसेवकांना बसण्यासाठी मूव्हिंग खुर्च्या असतील. सभागृहाबाहेरही स्क्रीन राहणार असून, त्याचे प्रक्षेपण लाईव्ह होणार आहे.

प्रेक्षक, मीडिया गॅलरी

महासभेत अधिकाऱ्यांना बसण्यासाठी आता स्वतंत्र जागा करण्यात येणार आहे; तर सभागृहाच्या वरच्या भागात मीडिया गॅलरी असेल. सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरीही असणार आहे.

नवीन नगरसेवक, नव्या सभागृहात

सभागृह नूतनीकरणासाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात येणार आहेत. महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत १७ सप्टेंबर २०२३ ला पूर्ण होत आहे. त्यानंतर प्रशासकीय राजवट लागण्याची शक्यता आहे.

याच कालावधीत सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होईल. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यावर नव्याने निवडून येणारे नगरसेवक नवीन सभागृहातून कामकाज करण्याच्या दृष्टीने नूतनीकरणाचे काम होणार असल्याची माहिती महापौर व उपमहापौरांनी दिली.

Mayor Jayshree Mahajan, Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad and architect Neeraj Mantri while presenting the plan of the auditorium.
MP Unmesh Patil : देशभरातील सक्रिय सदस्यांच्या यादीत खासदार उन्मेश पाटील ‘टॉप 10’मध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com