Ayushman Bharat Card: रेशन दुकानातही मिळणार आयुष्यमान भारत कार्ड; लाभार्थ्यांना दिलासा

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Cardesakal

Ayushman Bharat Card : तालुक्यात आता ग्रामपंचायतीबरोबरच रेशन दुकानातही आयुष्यमान भारत कार्ड काढून मिळणार आहे. याबाबत तालुक्यातील १७४ रेशन दुकानदारांना तहसील कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले.

सेतू केंद्रांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी पायपीट होत होती. याची दखल घेऊन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी बुधवारी (ता. २७) तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे प्रशिक्षण दिले. (Ayushman Bharat card will be available in ration shops jalgaon news)

आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थी हे रेशन दुकानातून धान्य घेणारे लाभार्थी असल्याने रेशन दुकानदार त्यांचे थम इम्प्रेशन घेऊन स्थानिक पातळीवर प्रकिया पूर्ण करू शकतील. धान्य वितरीत करताना जी प्रणाली अवलंबली जाते, त्याच प्रणालीने आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने रेशन दुकानात तत्काळ आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकते. आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या नागरिकांना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत शुल्क माफ आहेत.

प्रशिक्षण प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. नरेश पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील सूर्यवंशी, आरोग्य पर्यवेक्षक बशीर पिंजारी, रवींद्र सूर्यवंशी, हेमंत पाटील, स्वप्नील महाजन, किशोर पाटील, धीरज पाटील, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तेजराव ठोंबरे, सचिव राजेंद्र देशपांडे, सर्व रेशन दुकानदार, सर्व आरोग्यसेवक व गटप्रवर्तक ज्योती पाटील, अर्चना टोके, सविता कुमावत, यमुना जाधव आदी उपस्थित होते.

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्मान भारत’मध्ये महिलांची सरशी; राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर तर हिंगोली सर्वांत पिछाडीवर

"रेशन दुकानावर आयुष्यमान भारत कार्ड मिळणार असल्याने नागरिकांची पायपीट थांबणार आहे. त्यांना लवकर कार्ड मिळतील. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करावी." - नानासाहेब आगळे, तहसीलदार, जामनेर.

''जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीबरोबरच रेशन दुकानात आयुष्यमान भारत कार्ड मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल. तालुक्यातील सर्व कार्ड जानेवारीअखेर काढून पूर्ण होतील." - डॉ. राजेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat E Card : आयुष्यमान ई कार्ड वाटपात नाशिक राज्यात अव्वल! असे काढा इ कार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com