Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्मान भारत’मध्ये महिलांची सरशी; राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर तर हिंगोली सर्वांत पिछाडीवर

पंतप्रधान आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जात आहे.
Ayushman Card
Ayushman Cardsakal

छत्रपती संभाजीनगर - पंतप्रधान आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जात आहे. यासाठी राज्यात ३९ कोटी ९९ लाख ३५ हजार ८९२ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले.

सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ३७ लाख १४ हजार ४४२५ तर हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी दोन लाख ३९ हजार ३०९ जणांनी हे कार्ड काढले. राज्यात कार्डधारक महिलांचे प्रमाण ५३.६२ तर पुरुषांचे ४६.३८ टक्के आहे. महिला कार्ड काढण्यात आघाडीवर आहेत.

राज्यात सर्वाधिक ५१.१९ टक्के कार्ड १९ ते ४५ वयोगटातील महिला-पुरुषांनी काढले. यासोबत शून्य ते पाच वयोगटातील ३.२१ टक्के, ६ ते १८ वयोगटातील १०.५५ टक्के, ४६ ते ६० वयोगटातील २०.७७ टक्के तर ६० वर्षांपुढील १४.२८ टक्के महिला-पुरुषांनी कार्ड काढले. योजनेचा लाभ मिळावा यासाठी मागील काही महिन्यात कार्ड काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

देशात उत्तर प्रदेश आघाडीवर

देशभरात आतापर्यंत ४९ कोटी २१ लाख १४ हजार ४४५९ आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले. सर्वाधिक पाच कोटी ८० लाख ८७ हजार ५५४ उत्तर प्रदेशात तर मध्य प्रदेशात चार कोटी १६ लाख २७ हजार ८८७, आंध्र प्रदेशात चार कोटी १० लाख ७७ हजार २५८ कार्ड काढण्यात आले. देशात ५१.४० टक्के महिला तर ४८.५९ टक्के पुरुषांनी हे कार्ड काढले आहे.

अर्ज कसा करावा

  • आयुष्मान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वांत अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • नवीन नाव नोंदणीसाठी न्यू रजिस्ट्रेशन तसेच अप्लाय यावर क्लिक करा

  • तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड आदी माहिती नोंदवा.

  • माहिती नोंदवल्यानंतर ती पुन्हा एकदा चेक करा.

  • सर्व कागदपत्रे अपलोड करा.

  • पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा

  • त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.

ही कागदपत्रे लागतील

आधार कार्ड, शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com