जळगाव : केळी नुकसानीचे सत्र सुरूच

चिनावल शेतीशिवारात दहा शेतकऱ्यांचे नुकसान
अजनाड (ता. रावेर) : केळी बागेत माथेफिरूने केळी घडासह कापून फेकलेले केळीचे खोडे.
अजनाड (ता. रावेर) : केळी बागेत माथेफिरूने केळी घडासह कापून फेकलेले केळीचे खोडे.Sakal

चिनावल (ता. रावेर) - येथील शेती शिवारात केळी कापून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे सत्र थांबता थांबत नसून, गुरुवारी (ता.१४) रात्री १० शेतकऱ्यांचे सुमारे २०० केळी खोड घडासहित कापून नुकसान केल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वारंवार घटना घडत असताना शेतकरी एकत्र येत आंदोलन करूनही पोलिसांना यश येत नसल्याने या अज्ञात नुकसान करणाऱ्या भामट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. रोझोदा रस्त्यावर गुरूवारी रात्री १० शेतकऱ्यांचे सुमारे २०० केळी खोड घडासहित कापून नुकसान केले आहे. यात या शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात परेश मुकुंदा महाजन, चंद्रकांत धर्मा नेमाडे, सुहास पाटील, निखिल विनायक गारसे, नरेंद्र गेदराज पाटील, विनोद टोके, संजय पोपट चौधरी, कैलास डोंगर भंगाळे यांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना समजताच सदर शेतकरी परेश महाजन यांनी सावदा पोलिस ठाण्याला तक्रार दाखल केली आहे.

केळीचे घड कापून फेकले; अजनाड येथील प्रकार

रावेर - रावेर, यावल तालुक्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या घटना ताज्या असताना आता तालुक्यातील पूर्व भागातील अजनाड येथील शेतकऱ्यांचे केळी खोडे कापून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजनाड येथील शेतीशिवार गट क्रमांक ३३७ मधील शेतकरी राहुल बाळू महाजन यांच्या शेतातील केळी घडासह अज्ञात माथेफिरूने सुमारे तीन हजार रुपयांचे केळीची खोडे कापून फेकली. या बाबत राहुल महाजन यांनी रावेर पोलिस ठाण्यात नोंद केली आाहे. दरम्यान अजनाड येथीलच जगन्नाथ धनू चौधरी, कडू लक्ष्मण महाजन, गजानन भास्कर पाटील, सुरेश लक्ष्मण महाजन, देवेंद्र नारायण महाजन, प्रकाश विठ्ठल महाजन यांच्या शेतातील केळी खोड अज्ञात माथेफिरूने कापून नुकसान केल्याचा प्रकार प्रकार आज घडला. तसेच केबलही चोरून नेली आहे. याबाबत रावेर पोलिसात शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव व पोलिस कर्मचारी यांनी पाहणी केली. या घटनेने शेतकरी संतप्त झाले आहे. पोलिस नाईक नितीन डांबरे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com