जळगाव : सावधान..! रस्त्यावरून चालताना मोबाईल लंपास

शहरात भरदिवसा वाढले प्रकार
Be careful Mobile stolen while walking on street
Be careful Mobile stolen while walking on streetsakal

जळगाव : शहरातील घाणेकर चौकातून पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुरूवारी (ता. १६) शनीपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अशाप्रकारचे गुन्हे वाढले असून दिवसाढवळ्या हे प्रकार घडत असल्याने पोलिसांचा धाक संपला की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

Be careful Mobile stolen while walking on street
ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गासाठी

कांचननगरातील तरुण गिरीश माळी (वय २२) सोमवारी (ता. १३) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत पायी जात असताना त्याच्या मागून दोन चोरटे दुचाकीवर आले. चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. तरुणाने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले होते. याप्रकरणी गिरीश माळीने शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोन जणांविरोधात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com