Jalgaon News : सावखेड्यात उद्यापासून भैरवनाथांचा पाचोरा तालुक्यातील सर्वांत मोठा यात्रोत्सव!

Attractive brass idol of Bhairavnath in the temple.
Attractive brass idol of Bhairavnath in the temple.esakal

पाचोरा (जि. जळगाव) : सावखेडा (ता. पाचोरा) येथील जागृत व नवसाला पावणाऱ्या भैरवनाथांचा यात्रोत्सव रविवारपासून (ता. २५) सुरू होत असून, पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजे महिनाभर हा यात्रोत्सव चालणार आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी व प्रचंड आर्थिक उलाढाल करणारी यात्रा म्हणून या यात्रेचे महत्त्व असून, मंदिर देवस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. (Bhairavnath biggest yatrotsav in Pachora taluka from tomorrow in Savkheda Jalgaon News)

पाचोरा- जामनेर रस्त्यावरील वरखेडी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात भैरवनाथांचे देवस्थान आहे. पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी येथे यात्रा भरते. भैरवनाथ महाराज की जय म्हणत भाविक या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात.

सावखेडा येथील भैरोबा सुख शांती देणारा म्हणून भाविकांचे आकर्षण ठरले असून, या मंदिराला सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. भैरवनाथांच्या दरबारात नवस फेडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड असते. यात्रेप्रसंगी अथवा इतरत्र रविवारी वरणभट्टी व वांग्याच्या भाजीचा नवस फेडला जातो. अनेक कुटुंबीय विरंगुळा म्हणून रविवारी या ठिकाणी येऊन सामूहिक वनभोजनाचा आनंद लुटतात. भैरोबासमोर गुळाचा नवसही मानला जातो. गूळतुलाही केली जाते. प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते.

Attractive brass idol of Bhairavnath in the temple.
Nashik News : 2 महिन्यातच सरपंचासह सदस्यांचे राजीनामे! कारण अद्याप गुलदस्त्यात!

बैलगाड्यांची प्रथा

खानदेशातील भाविक बैलगाड्या घेऊन या यात्रोत्सवासाठी येण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त शनिवारी रात्री बैलांच्या घुंगरांचे आवाज परिसरात निनादतात. भल्या पहाटेपासून भाविकांचे येणे सुरू होते व ते सायंकाळपर्यंत थांबून बैलगाडीने परततात. ट्रॅक्टर, खासगी वाहने यांची ही संख्या आता वाढीस लागलेली आहे

भैरवनाथांच्या मंदिरात काळ्या पाषाणातील गोलाकार गोटा असून, मनोकामना पूर्ण करणारा गोटा म्हणून तो भाविकांचे आकर्षण ठरला आहे. यात्रेप्रसंगी अथवा इतर रविवारी परिसरातील गोरगरीब कुटुंबीय येथे विवाह सोहळे पार पडतात. स्वयंपाकासाठीची जागा, पाण्याची व राहण्याची व्यवस्था येथे असल्याने विवाहाची वऱ्हाडी मंडळी मोठ्या देवस्थानाप्रमाणे येथे दोन, तीन दिवस थांबतात. भैरोबा देवस्थान मंडळातर्फे सर्व सुविधा पुरवली जाते. यात्रेप्रसंगी लावण्यात आलेल्या उपहारगृहात गुळाची जिलेबी व कांदा मिरचीची भजी खाण्याची प्रथा कायम आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Attractive brass idol of Bhairavnath in the temple.
Gram Panchayat Election : गोळवाडला 25 वर्षांनंतर निवडणूक; बिनविरोधची परंपरा खंडीत!

मंदिर पूर्णत्वास

भैरवनाथांचे मंदिर लोकवर्गणीतून पूर्णत्वास आले असून, संस्थांनतर्फे त्याची देखभाल केली जाते. नवस, विवाह यांच्या मोबदल्याबाबत संस्थानतर्फे कोणतीही सक्ती केली जात नाही. इच्छेनुसार मिळालेल्या निधीतून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.भव्य व देखण्या अशा मंदिरात तीन पितळाच्या मूर्ती आहेत.

महिनाभर उत्साहाला उधाण

परिसरातील विविध मंडळाचे कार्यकर्ते, भाविक ढोल-ताशे वाजवत भगवा ध्वज उंचावत ‘भैरोबा महाराज की जय’ म्हणत येथे येतात. यात्रेनिमित्ताने भांडी, खेळणी, हॉटेल, रसवंती, लहान मोठे पाळणे, मौत का कुवा लावला जातो. पाचोरा आगाराच्या वतीने स्वतंत्र बससेवेची व्यवस्था करण्यात येते. तसेच रिक्षाचालकही यात्रोत्सवानिमित्ताने भाविकांची ने आण करतात.

महिनाभर चालणाऱ्या या यात्रेमुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. हा यात्रोत्सव रविवारपासून (ता. २५) सुरू होत असून, पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजे २५ डिसेंबर, १ ,८, व १५ जानेवारीला साजरा होत आहे. या निमित्ताने भाविक आनंदले असून, धार्मिकतेला उधाण आले आहे.

Attractive brass idol of Bhairavnath in the temple.
Palase Bus Accident Case : ‘त्या’ बसचे ब्रेक फेल नव्हते! बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com