भुसावळला मध्य रेल्वेचे सर्वांत मोठे ‘रनिंग रूम’

महाव्यवस्थापकांकडून कौतुकाची थाप; इकोफ्रेंडली इमारतीत अत्याधुनिक सुविधा
Bhusawal
Bhusawalsakal

भुसावळ : भुसावळ जंक्शन हे मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभाग, पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभाग आणि पश्‍चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाच्या मेल/एक्स्प्रेस आणि मालवाहू गाड्यांमधील क्रू चेंजिंग पॉइंट आहे. ही नव्याने बांधलेली इकोफ्रेंडली पाचमजली रनिंग रूमची इमारत तीन पंख असलेली ‘वाय’ आकाराची आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी वार्षिक तपासणीदरम्यान सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीची पाहणी केली. येथील सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

Bhusawal
Union Budget 2022 : मानसिक आरोग्यासाठी मोठी घोषणा

मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य विद्युत अभियंता गोपाल चंद्र, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक मुकुल जैन, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मणिजित सिंह, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आलोक सिंग, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक एस. के. पंकज, मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता ए. के. श्रीवास्तव, प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक आर. एल. राणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. या पाचमजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर ३० खोल्या असून, त्या पूर्णत: वातानुकूलित आहेत. तळमजल्यावर किचन, डायनिंग हॉल, रिक्रिएशन रूम, इनडोअर जिम, मेडिटेशन रूम आदी सुविधा आहेत. महिला क्रू मेंबर्ससाठी त्यांच्या रनिंग रूममध्ये राहताना अखंडपणे बेड विश्रांतीची खात्री करण्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. हे मध्य रेल्वेवरील मोठे रनिंग रूम आहे, ज्यामध्ये २५० खाटांची क्षमता आहे आणि त्यात शौचालयाचीही व्यवस्था आहे.

Bhusawal
Union Budget 2022: शेअर मार्केटची सकारात्मक सुरूवात

इमारतीची ठळक वैशिष्ट्ये

  • इमारतीत अखंड पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक मजल्यावर वॉटर कूलर आणि दोन स्वतंत्र पाण्याचे पंप उपलब्ध करून देणारी पिण्याच्या पाण्याची सुविधा

  • शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर

  • इनडोअर बोर्ड गेम्स आणि बास्केटबॉल, बॅडमिंटनच्या मैदानी क्रियाकलापांसारख्या करमणुकीच्या सुविधा

  • महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मनोरंजन कक्ष

  • एक डिजिटल उपक्रम म्हणून उत्तम ऑक्युपन्सी मॉनिटरिंगसाठी संगणकीकृत रनिंग रूम मॅनेजमेंट सिस्टिम स्थापित

  • स्वतंत्र ३२० केव्हीए डीजी सेटसह २४ तासांचा बॅकअप वीजपुरवठा

  • दोन अत्याधुनिक लिफ्टसह १०० टक्के एलईडी लाइटमुळे विजेच्या वापरात होणार बचत

  • संपूर्ण रनिंग रूम फायर अलार्म सिस्टिमने सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह चोवीस तास सुरक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com