Racer Bikers : मेहरुण ट्रॅकवर रेसर बाईर्क्सचा उच्छाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

injured hiraman chavan

Racer Bikers : मेहरुण ट्रॅकवर रेसर बाईर्क्सचा उच्छाद

जळगाव : वाहतुकीसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेहरुण ट्रॅकवर मॉर्निंग वॉकचा आनंद घेणाऱ्या नेहरूनगर येथील रहिवासी व नुकतेच पाटबंधारे विभागातून निवृत्त झालेले शाखा अभियंता हिरामण चव्हाण यांना मागून वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने (Biker)जोरदार धडक दिली. (bike hit to person going for morning walk jalgaon news)

यामध्ये ते जखमी झाले असून, धडक देणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वारांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हिरामण चव्हाण नेहमीप्रमाणे मेहरुण ट्रॅकवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्या वेळी मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार अपघातस्थळी न थांबता तो शहराच्या दिशेने निघून गेला. या अपघातात हिरामण चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :BikesJalgaonaccident