- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

नंदुरबार- धुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे किलिंग प्रक्रियेला सुरवात केली आहे.

नवापूर : नवापूर तालुक्यात आतापर्यंत २९ कुकूटपालन केंद्रांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याने सहा लाखपेक्षा अधिक पक्षी व २६ लाखपेक्षा जास्त अंडी नष्ट करण्याचे काम प्रशासनातर्फे पूर्ण केले आहे.
शहरातील सर्वांत मोठ्या शोली कुक्कुटपालन केंद्रातील बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझिटिव आल्याने प्रशासनातर्फे किलिंग प्रक्रियेला शुक्रवार (ता. २६)पासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शोली पोल्ट्रीत ४४ हजार ९०२ कुकुट पक्षी नष्ट केले.
आवश्य वाचा- आहो आश्चर्यम ! महापौरांचा गौरव..तोही शिवसेनेकडून
शोली पोल्ट्री फार्ममध्ये एकूण दोन लाख ३८ हजार कुक्कुट पक्षी व ३० लाख पेक्षा अधिक अंडी आहेत. पुढील चार दिवसात येथील सर्व पक्षी व अंडी प्रशासनातर्फे नष्ट करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी व नंदुरबार- धुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे किलिंग प्रक्रियेला सुरवात केली आहे. नवापूर तालुक्यात आतापर्यंत ३० पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू ची लागण झाल्याने कुकुट पालन व्यावसायिकांचे २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई ची मदत वेळेवर द्यावी अशी मागणी केली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
