Latets Marathi News | वाहनांसाठी स्वयंपाकाच्या गॅसचा काळाबाजार; पोलिसांत गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Cylinder

वाहनांसाठी स्वयंपाकाच्या गॅसचा काळाबाजार; पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : घरगुती स्वयंपाक गॅस चारचाकी वाहनांमध्ये ब्लॅकच्या दरात भरून काळाबाजार करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. (Latest Marathi News)

रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमी परिसरात घरगुती स्वयंपाक गॅसचा वापर वाहनांमध्ये ब्लॅकच्या दरात भरुन दिला जात असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने माहितीची खात्री करुन छापा टाकत रहिमबेग हसनबेग मिर्झा (वय ३८, रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) याच्याकडून १२ हजार रूपये किंमतीचे ६ घरगुती गॅसचे सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य व मशिन असा एकूण २७ हजार रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सायंकाळी पोलिस नाईक इमरान अली युसूफअली सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रहिमबेग हसनबेग मिर्झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.