Jalgaon News : कापूस मार्केटमध्ये तेजीची चिन्हे

Cotton Market
Cotton Marketesakal

जळगाव : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारपेठेत आज खंडीचे दर अचानक वाढल्याने जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात आज व्यापाऱ्यांनी वाढ केल्याचे चित्र होते.

चार दिवसांपूर्वी कापसाचे मार्केट डाउन होऊन कापसाचे दर सात हजार ३०० ते सात हजार ५०० पर्यंत खाली होती. आज त्यात वाढ होऊन आठ ते साडेआठ हजारांचा दर कापसाला मिळाला आहे. यामुळे कापूस मार्केट तेजीत येण्याची शक्यता वाढली आहे. (Boom in cotton market Rate increase of cotton Jalgaon News)

Cotton Market
Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळावा, यासाठी राज्यात ‘सीसीआय’तर्फे खुल्या बाजारात कापूस खरेदी केंद्रे सुरू होती. असे असताना चार दिवसांपूर्वी देशभरातील कापसाचे दर गडगडून कापूस मार्केट ‘क्रॅश’ झाले.

यामुळे शेतकऱ्यांनी राज्यभरात कापूस विक्री थांबविली होती. कापूसच खरेदी केंद्रावर येत नसल्याने नगर, नंदुरबार केंद्र ओस पडली आहेत. इतर केंद्रांची हीच स्थिती आहे, तर नवीन सुरू होणाऱ्या केंद्रा काय स्थिती असेल? यामुळे जळगावचेही केंद्र लवकर सुरू होणार नसल्याचे चित्र आहे. साडेआठ हजारांवरून सात हजार ३०० ते साडेसात हजारांपर्यंत कापसाचे दर खाली आले होते.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Cotton Market
New Year 2023 : पोलिसांची करडी नजर, तरीही नविन वर्षाचा जल्लोष...

कापसाला खासगी व्यापारी आठ ते साडेआठ हजार दर देत होते. मात्र, कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, अशी अपेक्षा करीत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणण्याचे टाळले आहे. कापसाचा हमीभाव सहा हजार ३८० रुपये आहे. व्यापारी आठ ते साडेआठ हजार दर देत आहेत. कापूस उत्पादक दहा ते तेरा हजारांचा दर मागत आहेत.

यामुळे कापूस बाजारात येत नसल्याने कापूस बाजार एकदम थंडावत असल्याची स्थिती होती. कापूस उत्पादकांची होणारी कोंडी फोडण्यासाठी ‘सीसीआय’ने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदीचा निर्णय घेत आठ हजार ४०० रुपये दर दिला होता.

सोमवार (ता. २६)पासून कापसाचे मार्केट क्रॅश झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात खंडीचे दर ५२ ते ५७ हजार झाले. यामुळे कापसाच्या दरात आणखी घसरण झाली. आज मात्र आंतरबाजारपेठेत कपाशीला मागणी वाढून खंडीचे दर ६१ ते ६२ हजारांवर गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यानी आठ ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला दिला आहे. यामुळे कापूस उत्पादक बाजारात कापूस विक्रीस आणतील, अशी आशा आहे.

Cotton Market
Jalgaon News : अबब ! जात प्रमाणित करण्यासाठी 10 लाखांची लाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com