Ganesh Patil
sakal
जळगाव - रेल (ता. धरणगाव) येथील १२ वर्षीय गणेश नवल पाटील याच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी (ता. २) तब्बल अडीच महिन्यांपूर्वी गिरणा नदीकाठी पुरलेला त्याचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका मुलाने छातीत बॅट मारल्यामुळे गणेशचा मृत्यू झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला चक्कर येऊन मृत्यू झाल्याच्या खोट्या समजुतीमुळे कुटुंबियांनी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केले होते. मात्र, सत्य समोर आल्यानंतर पित्याने न्यायासाठी घेतलेल्या धावेमुळे पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार मृतदेह उकरून धुळे येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.