Jalgaon : दिवंगत चुलत बंधूच्या उपकाराची उतराई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Married Couple priyanka mahajan &  shubham mahajan

Jalgaon : दिवंगत चुलत बंधूच्या उपकाराची उतराई

जामनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील ओझर येथील चुलत भावाने उच्च पदावर असताना, नोकरी मिळवून दिली. उच्चपदस्थ चुलत भावाचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला सात जन्माची साथ देऊन चुलत वहिनीशी विवाह (Wedding) करून समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला. तालुक्यातील ओझर गावी ही घटना घडली. (brother in law married with widowed women of his brother Jalgoan News)

ओझर गावामधील महाजन परिवारातील एक उदयोन्मुख तरुण अनिल एकनाथ महाजन पुणे येथे इंडस्लंड बँकेत मॅनेजर म्हणून मोठ्या पगाराच्या नोकरीवर होता. मागील वर्षी जून महिन्यात त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी प्रियंका अनिल महाजन यांना दोन महिन्याची मुलगी होती. ती दोन महिन्याची मुलगी व प्रियंका यांचा फार मोठा आधार हरवला. तरुणाची पत्नी प्रियंका कमी वयात विधवा झाली. अशावेळी परिवारावर फार मोठा आघात झाला होता. अनिल महाजन ज्यावेळी नोकरीस होते, त्यावेळी त्यांनी गावातील व आपल्या भावकीतील अनेक जणांना बँकिंग क्षेत्रात नोकरीला लावले होते.

हेही वाचा: पारोळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी स्पर्धा यशस्वी

अनिल महाजन यांचे वडील व त्यांच्या विधवा पत्नीच्या माहेरील मंडळी प्रियंका अकाली आलेल्या विधवापणामुळे चिंतीत होते. तिचे वय पाहता त्यांची चिंता होतीच. त्याच वेळी ईश्वरलाल जैन पतसंस्थेचे अध्यक्ष तथा दानशूर व्यक्तिमत्त्व कचरूलाल बोहरा यांचे महाजन परिवाराशी असलेले निकटचे संबंध असल्याने त्यांनी पुनर्विवाहासाठी राजी केले, पण त्याच वेळी तिच्याशी विवाह कोण करणार, अशी चर्चा आणि विचारविनिमय सुरू होता. प्रियंकाचा दीर अविवाहित शुभम सुरेश महाजन यांच्याकडे याबाबत चर्चा केली असता, त्याने लागलीच होकार दिला. तसेच त्याचे वडील सुरेश महाजन यांनी होकार दिला. चर्चेअंती दोघांचा विवाह करण्याचे ठरले व २२ जूनला मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील इच्छादेवी मंदिरात यांचा विधिवत विवाह सोहळा पार पडला.

हेही वाचा: Jalgaon : वीजमोटर चोरणारे 3 चोरटे गजाआड

Web Title: Brother In Law Married With Widowed Women Of His Brother Jalgoan News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..