Crime Alert : बँक कर्मचाऱ्याच्या घरीच घरफोडी

Burglary
Burglaryesakal
Updated on

पारोळा (जि. जळगाव) : शहरातील गंगुबाईनगर येथे बँक कर्मचाऱ्याचे (Bank Employee) घर बंद असल्याचा फायदा घेत रोकडसह लाखाच्या वर दागिने लंपास केले. (Burglary at the house of a bank employee Jalgaon News)

Burglary
भोंग्यावरून राजकारण चालणार नाही : मंत्री अस्लम शेख

ललित राजपूत हे ३० एप्रिलला कामानिमित्त नागपूर येथे गेले होते. त्यातच त्यांची पत्नी ही अक्षय तृतीयाच्या (Akshay Tritiya) सणानिमित्त माहेरी असल्याने राजपूत यांचे घर बंद होते. सोमवारी (ता. २) सकाळी ११ ते तीन सकाळी साडेचारच्या सुमारास शेजारील घरातील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे राजपूत यांनी घरात प्रवेश केला असता घरातील ७० हजार रुपये रोख तसेच पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, दीड ग्रम सोन्याच्या अंगठ्या, एक ग्राम सोन्याची नथ, चांदीचे दागिने भांडे तसेच साखळ्या असा सर्व मिळून एक लाखाच्या वर ऐवज चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत लंपास केला. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल तपास करीत आहेत.

Burglary
OPD सुरू करण्याचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com