भोंग्यावरून राजकारण चालणार नाही : मंत्री अस्लम शेख

speaker Minister Aslam sheikh
speaker Minister Aslam sheikhesakal

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यातील सरकार व यंत्रणा सक्षम आहे. भोंग्याच्या नावाने भोंग्यासारखा आवाज काढणाऱ्यांचे राजकारण चालणार नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. राज्यात कोठेही काही होणार नाही, असा विश्‍वास वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी मंगळवारी (ता. ३) येथे व्यक्त केला. (Politics will not work on Loudspeaker Minister Aslam Sheikh Nashik News)

शहरातील अमन चौकात झालेल्या ईदमिलन व कॉंग्रेस (Congress) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे निमंत्रक माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक एजाज बेग अध्यक्षस्थानी होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आमदार हाजी अमीन पटेल, आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudheer Tambe), कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शरद आहेर, प्रसाद हिरे, डॉ. मंजूर अय्युबी, जमील क्रांती आदी व्यासपीठावर होते.

श्री. शेख म्हणाले, की काही पक्ष आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्यांना टार्गेट करीत आहेत. भोंग्याच्या नावाने भोंग्यासारखा आवाज काढत आहेत. त्यांना जनता ओळखून आहे. राज्यातील यंत्रमाग उद्योग बिकट स्थितीत वाटचाल करीत आहे. वस्त्रोद्योग विभागातर्फे सूतगिरणीचे अर्थसहाय्य वाढविले आहे. भिवंडी, मालेगावचा अभ्यास सुरू आहे. या शहरांची वस्त्रोद्योगात इचलकरंजीसारखी प्रगती व्हावी, ही माझी अपेक्षा आहे. शहरवासीयांना विश्वासात घेऊन त्यासाठी प्रयत्न करू. अर्थसहाय्य, अनुदान यांसह अन्य काही करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govenment) सक्षम आहे. सरकार कायद्यानुसार चालेल. कोणाच्या मर्जीनुसार नाही.

speaker Minister Aslam sheikh
सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; गुढीपाडव्यापेक्षा दुप्पट गर्दी

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, की शहरातील यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडवू. रमजान ईदच्या (Ramzan Eid) शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो. रोजा, उपवास आत्मचिंतन करण्याची संधी आहे. रमजान ईद राष्ट्रीय एकात्मता साधणारा सण आहे. काही जण जाती-धर्माच्या नावाने राजकारण करीत आहेत. जातीच्या धर्माच्या नावाने होणारे ईझी पाॅलिटिक्स विकासापासून दूर नेणारे आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करा हा पक्षाचा हेतू आहे. काॅंग्रेस एक विचारधारा आहे. पक्षाला चांगले दिवस हमखास येतील. आमच्या काही मित्रांनी आमच्याबरोबर चालताना आमचा खिसा कापला, अशी कोपरखिळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव न घेता मारली. आमदार तांबे, आमदार पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. एजाज बेग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थितांना ईदमिलननिमित्त शिरखुर्मा देण्यात आला. मेळाव्यास कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, सतीश पगार, जैनू पठाण, रामराव शेवाळे, मनोज अवस्थी, फारुक लाला, अन्वर भिवंडीवाले यांच्यासह बहुसंख्य कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

speaker Minister Aslam sheikh
OPD सुरू करण्याचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com