OPD सुरू करण्याचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bytco Hospital

OPD सुरू करण्याचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला

नाशिकरोड : अक्षयतृतीयेला ओपीडी (OPD) सुरू करणार, असे सूतोवाच महानगरपालिकेच्या (NMC) सूत्रांनी केले होते. मात्र, ओपीडी तयार असून केवळ आयुक्तांचा आदेश बाकी असल्याचे बिटको प्रशासनाने ‘सकाळ’ला सांगितले. (administration completed all work & commencement of OPD is stopped by order of commissioner Nashik News)

हेही वाचा: सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; गुढीपाडव्यापेक्षा दुप्पट गर्दी

अक्षयतृतीया (Akshay Tritya) मुहूर्तावर ओपीडी नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये सुरू करणार होते. मनपा बिटको हॉस्पिटल (Bytco Hospital) प्रशासनाने सर्व काम पूर्ण केले असून आयुक्तांच्या आदेशावरून ओपीडी सुरू करणे थांबले आहे. आयुक्तांचा आदेश आल्यावर ओपीडी सुरू होईल, असे बिटको रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, ओपीडी सुरू झाल्यावर बिटको हॉस्पिटलच्या कामकाजात सूत्रबद्धता येणार आहे. जुन्या हॉस्पिटलमध्ये जागा कमी पडत होती. याशिवाय अनेक असुविधा होत्या. यामुळे नवीन रुग्णालयात ओपीडी सुरू होण्याची नाशिकरोडकर चातकासारखी वाट पाहत आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्याचे अनोखे ‘अश्वनृत्य’; आदिवासींची संस्कृती टिकविण्यासाठी धडपड

Web Title: Administration Completed All Work Commencement Of Opd Is Stopped By Order Of Commissioner Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top