Jalgaon Crime News : बिस्मिल्ला चौकात बंद घर फोडले; सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

burglary News

Jalgaon Crime News : बिस्मिल्ला चौकात बंद घर फोडले; सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव : शहरातील तांबापुरा बिस्मिल्ला चौक येथील एका मजुराचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सोमवारी (ता.१९) रोजी रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (burglary on closed house in Bismillah Chowk Jalgaon Crime News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

तांबापुरा बिस्मिल्ला चौकातील रहिवासी मज्जिद शहा हसनशहा फकीर (वय ५१) मोलमजुरी करतात. बुधवार (ता.१४) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

सोमवार (ता.१९) रोजी सकाळी ९ वाजता मज्जिद शहा हसीन शहा फकीर हे घरी आल्यावर त्यांच्या घराचे कुलूप तोडून फेकलेले दिसून आले. घरात गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.