Nashik News : अर्भक दगावल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई

Crime News
Crime Newsesakal

नाशिक : चिखलओहोळ (ता. मालेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार न मिळाल्याने एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांसह दोन आरोग्य सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दणका दिला आहे. वैद्यकीय अधिका-यांचा सेवासमाप्तीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.

चिखलओहळ गावात शेतमजुरीसाठी आलेल्या सोनाली दिलीप शिंदे (३५, रा. परभणी) या प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. ६ डिसेंबरला प्रसूती सुखरूप पार पडली. दुपारी बाळाची तब्येत खालावल्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी आरोग्य केंद्रावर डॉक्टर्स, नर्स किंवा आरोग्य सहायक कर्मचारी उपस्थित नव्हते. (In Case of infant death Disciplinary action Nashik News)

Crime News
Nashik Motivational Story : फुलांच्या माळविक्रीतून जयश्रीताईंनी उभा केला संसार

तब्बल एक तास बालकाला त्रास होत असताना वेळीच उपचार न झाल्याने ते दगावले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी आरोग्य केंद्रास भेट देवून त्याची पाहणी केली होती. या आरोग्य केंद्रामधील डॉक्टर आणि आरोग्य सहाय्यक हजेरी वहीमध्ये स्वाक्षरी करून केंद्रात उपस्थित नसल्याचे उपासात उघड झाले आहे.

चौकशी अधिकारी डॉ. नेहेते आणि डॉ. युवराज देवरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार मित्तल यांनी या सहा कर्मचाऱ्यांना आपण आरोग्य केंद्रात का उपस्थित नव्हता? अशी नोटीस काढून पाच दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Crime News
Nashik News : शहरातून Covishield गायब; मागणी करूनही शासनाकडून अदखल

अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी आपणास जबाबदार का धरले जाऊ नये? याबाबतही खुलासा करण्याचे आदेश बजाविले होते. त्यानुसार, संबंधितांना खुलासा सादर केला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्याने यातील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई अतंर्गत सेवासमाप्तीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

त्यांची बदली थेट बोरगाव (ता. सुरगाणा) प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आली आहे. केंद्रातील दोन आरोग्यसेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. नेहेते यांनी दिली. याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

Crime News
Gram Panchayat Election Result: ZPच्या शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या स्वंयपाकी बनल्या लोकनियुक्त सरपंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com