Jalgaon News : महामार्गावर ‘बर्निंग ट्रॅव्हल्स’चा थरार; सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

Sai Siddhi Travels caught fire on Barhanpur-Ankleshwar State Highway.
Sai Siddhi Travels caught fire on Barhanpur-Ankleshwar State Highway.esakal

Jalgaon News : रावेरहून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन जाणारी साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धात संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र प्रवाशांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन बसमधून उतरले.

या घटनेत जीवितहानी टळली असली तरी प्रवाशांचा सामान जळून खाक झाला. रावेर-सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलाजवळ ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी घडली.(bus sudden fire on way to pune jalgaon news)

दिवाळी संपल्यामुळे रावेरहून ते पुण्यासाठी मोठ्या संख्येने खासगी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवासी जात आहेत. दरम्यान, शनिवारी (ता. १८) सायंकाळी रावेरकडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्सची रावेर-पुणे बस (क्रमांक एमएच ४०, एन. ५३६१) प्रवाशांना घेऊन जात असताना रावेर - सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलापुढील वळणावर बसने अचानक पेट घेतला.

हे प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांची तारांबळ उडाली. सुदैवाने गाडीतून धूर निघत असल्याचे कळल्याने आणि सायंकाळी त्यावेळी काहीसा उजेड असल्याने सर्व प्रवासी भराभर बसमधून खाली उतरले. जर ही घटना रात्री प्रवासी भर झोपेत असताना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा प्रवाशांमध्ये आहे.

रावेर, सावदा आदी ठिकाणच्या अग्निशमनने आग विझविली. मात्र या आगीत प्रवाशांचा सर्व सामान जळून खाक झाला आहे. राज्यात ट्रॅव्हलच्या अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुण्यासाठी प्रवाशांकडून अडीच हजार रुपये आकरणी करण्यात येऊनही जुन्या बसचा वापर करण्यात येत आहे.

Sai Siddhi Travels caught fire on Barhanpur-Ankleshwar State Highway.
Jalgaon News : प्रदूषणात महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाची भर; धुळीचा त्रास अन् वाहतुकीचा खोळंबा

तसेच बसची तपासणी व दुरुस्ती न करता ट्रॅव्हल्स बस धावत आहेत व प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. यामुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे आरटीओ विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

प्रवाशांमध्ये संताप

बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. टायर फुटल्याने आग लागल्याचे काहींचे म्हणणे आहे. या दुर्घटनेत प्रवाशांचा जीव वाचला असला तरी उत्तर त्यांना बहुतेकांचे सामान गाडीतच राहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

Sai Siddhi Travels caught fire on Barhanpur-Ankleshwar State Highway.
Jalgaon News : तुम्हीच सांगा जनावरे सांभाळायची तरी कशी? शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com