
Jalgaon News : धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृद्धेचा मृत्यू
जळगाव : नशिराबाद येथील वृद्धा धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच ठार झाली. कैसाबाई मंगा भोई (वय ६५, रा. भोईवाडा), असे मृत वृद्धेचे नाव आहे. भाऊ मृत झाल्याने त्यांचा भाचा अनिल झगडू भोई कैसाबाई भोई यांचा संभाळ करीत होते.
रविवारी (ता. २९) दुपारी चारला कैसाबाई भोई जळगाव ते भादली अप लाईनवर रेल्वे रूळ ओलांडत असताना, धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत रेल्वे गाडीचालकाने जळगाव रेल्वेस्थानक प्रबंधकांना माहिती दिली.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
नंतर घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. त्यावरून नशिराबाद पोलिस घटनास्थळी पोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला.
सोमवारी (ता. ३०) सकाळी दहाला विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार अतुल महाजन तपास करीत आहेत.