वेतन भत्ते, समावेशन, करिअर ॲडव्हान्समेंट योजनेसाठी ‘कँडल मार्च’

वैद्यकीय अध्यापकांचा मोर्चा, सोमवारी थाळीनाद आंदोलन
Candle march for Salary Allowance Career Advancement Scheme jalgaon
Candle march for Salary Allowance Career Advancement Scheme jalgaonsakal

जळगाव : विविध प्रकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळाले पाहिजे, अशा विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक १४ मार्चपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कॅन्डल मार्च काढून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर शुक्रवारी सकाळी ‘कॅन्डल मार्च’ काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ॲडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे, अस्थायी साहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्युत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी १४ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन विविध प्रकारचे आंदोलन करीत आहे.

सोमवारी थाळीनाद आंदोलन

सोमवारी (ता. ७) थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. यासह १४ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अधिष्ठाता यांना घेराव असे विविध प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ. अरुण कसोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. इमरान तेली, डॉ. वैभव सोनार, डॉ. भारत घोडके, डॉ. विजय गायकवाड, डॉ. धनश्री पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. अंजली वासडीकर, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. मनोज पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. किरण सोनवणे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मोनिका युनाती, डॉ. अक्षय सरोदे आदी अध्यापकांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com