Jalgaon Crime News : शाहूनगरातून कार लांबविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car theft

Jalgaon Crime News : शाहूनगरातून कार लांबविली

जळगाव : शहरातील शाहूनगरातील महेश किराणाजवळून जितेंद्र कैलास मुळीक (वय ३८) खासगी कार चालवून उदरनिर्वाह करतो. त्यांच्या मालकीची कार (एमएच १९, बीजे ००५७) ४ जानेवारीला रात्री दहाला शाहूनगरातील नक्षत्र बिल्डिंगजवळ उभी केली होती. (car stolen from Shahunagar Jalgaon Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Crime News : शेतजमिनीच्या वादातुन भावजय व पुतण्यास जाळुन मारण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्याला अटक

मध्यरात्री चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेल्याचे ५ जानेवारीस सकाळी सातला उघडकीला आले. कारचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कोणतीही माहिती मिळाली नाही. शनिवारी (ता. ७) याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे तपास करीत आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यातून संशयित निसटले; शस्त्र, रॉडचा वापर, तरी हाणामारीच दाखल