रावेरला शस्त्रक्रियागृह वर्षभरापासून बंद; कोट्यवधींची सामुग्री धूळखात

Billions worth of machinery is dusted lying.
Billions worth of machinery is dusted lying.esakal

रावेर (जि. जळगाव) : केवळ दीड लाख रुपयांच्या केबलअभावी सुमारे वर्षभरापासून येथील ग्रामीण रुग्णालयातील (Rural Hospital) अद्ययावत शस्त्रक्रियागृह (Operation theater) आणि ऑक्सिजन प्लांट सुरू झालेला नाही. याबाबत येथील ग्रामीण रुग्णालयाने अनेक वेळा जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री येथे धूळखात पडली आहे. (operation theater closed year round Billions worth of contents in dust Jalgaon News)

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीत अद्ययावत शस्त्रक्रियागृह सुमारे वर्षभरापूर्वी उभारण्यात आले आहे. तसेच कोरोना रुग्णांसाठी आणि अन्य रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते म्हणून हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट येथे उभारून पूर्ण झाला आहे. त्यासाठी शासनाने ८० लाख रुपये खर्च केलेले आहेत.
अद्ययावत शस्त्रक्रियागृह आणि ऑक्सिजन प्लांट यांना लागणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर देखील येथे वीज वितरण कंपनीकडून बसविण्यात आला आहे. मात्र ट्रान्स्फॉर्मर ते ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीपर्यंत लागणाऱ्या केबलचा खर्च १ लाख ५४ हजार रुपये इतका आहे. या केबलअभावी ऑक्सिजन प्लांट आणि मॉडर्न ऑपरेशन थिएटर सुरू होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी येथे ट्रान्स्फॉर्मर बसवून देखील केबलअभावी त्याचा उपयोग सुरू झालेला नाही. त्यामुळे हे ट्रान्स्फॉर्मर येथून काढून दुसरीकडे नेण्याचा इशाराही वीज वितरण कंपनीने दिला आहे. लवकरच केबल उपलब्ध करून देऊ, अशा विनवण्या करून ग्रामीण रुग्णालयाच्या यंत्रणेने सध्या तरी हे ट्रान्स्फॉर्मर येथेच राहू देण्यात यश मिळवले आहे. या १ लाख ५४ हजार रुपयांच्या केबलसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पैसे मिळणे अपेक्षित आहे. ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही अजूनही हा निधी मिळालेला नाही. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट आणि अद्ययावत शस्त्रक्रियागृह या दोन्ही यंत्रणा धूळखात पडून आहेत. येथील शस्त्रक्रियागृह सुरू झाल्यास शस्त्रक्रिया करून होणारी बाळंतपणे (सीझर) ग्रामीण रुग्णालयातच होऊ शकतील. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी एक बाळंतपण होते. एका महिन्यात किमान ८ ते १० महिलांना शस्त्रक्रियेसाठी (सीझर) खासगी दवाखान्यात पाठवावे लागते. येथील शस्त्रक्रियागृहाला वीजपुरवठा मिळाल्यास रुग्णांना बाहेर पाठवावे लागणार नाही.

Billions worth of machinery is dusted lying.
Jalgaon : कत्तलीसाठी नेणाऱ्या गायींची बजरंग दलातर्फे सुटका

‘ऑक्सिजन प्लांट’ला सुरू करा
अलीकडच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढत असताना येथील ऑक्सिजन प्लांट देखील सुरू करण्याची आवश्यकता आहे. या ऑक्सिजन प्लांटचा उपयोग अन्य गंभीर रुग्णांसाठी ही होऊ शकणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी येथील अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Billions worth of machinery is dusted lying.
Jalgaon Crime : चोपड्यात घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com