Jalgaon Crime News : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : शहरातील श्यामनगर परिसरातून विनापरवाना वाळू (Jalgaon News) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. (case registered against tractor transporting sand without licence jalgaon crime news)

शहरातील श्यामनगर ते हरिविठ्ठलनगरात वाळूची अवैध वाहतूक ट्रॅक्टरद्वारे होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा पाटिल यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शोध पथकाने बुधवारी (ता. १२) सकाळी अकरला श्यामनगर परिसरात विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले.

ट्रॅक्टरचालक समाधान खंडू सोनवणे (रा. श्रद्धा कॉलनी, जळगाव) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crime
Jalgaon Accident News : ‘त्या’ अपघाताची दुसऱ्या दिवशीही नोंद नाहीच

परिणामी, वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. याबाबत पोलिस नाईक अजय सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी सायंकाळी पाचला ट्रॅक्टरचालक समाधान खंडू सोनवणे याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रेवानंद साळुंखे तपास करीत आहे.

Crime
Jalgaon News : तयार रस्त्यांवर 55 ठिकाणी मनपाकडून खोदकाम! मक्तेदाराकडून 30 वेळा पत्रव्यवहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com