गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 6 जणांना अटक | latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon crime news

गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 6 जणांना अटक

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळागाव) : तालुक्यातील विविध गावातून गुरांची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून एकूण सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून रोकडसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान चौकशीतून अधिक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Cattle stealing gang busted 6 people arrested jalgaon crime latest Marathi news)

याबाबत सविस्तर वृत्त, ममराज भाईदास जाधव (वय 30) रा. सोनगाव ता. चाळीसगाव या शेतकऱ्याची सोनगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमधून १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे जनावरे अज्ञाताने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवार, (ता. १३) रोजी घडली होती.

याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा रजि नं. ३८८/२०२२ भादंवि कलम- 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचे तपास पोहेकॉ नितीन सोनवणे हे करीत होते. दरम्यान गुरांच्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

त्यानुसार चोरी करणारी टोळी हि शिलोड जि. औरंगाबाद येथील असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना शुक्रवार रोजी मिळाली. त्यावर पोना नितीन आमोदक, पोना गोवर्धन बोरसे, पोना संदिप पाटील या पथकाने सदर ठिकाण गाठून शेख इम्रान शेख ईसा, (वय 30), शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान (वय 26), शेख उमेर शेख ताहीर (वय 27), सर्फराज बिलाल खाटीक (वय 22), शेख सत्तार शेख ईसा (वय 24), शेख इरफान शेख ईसा (वय 33) सर्व रा. आबदलशा नगर, इदगाह, सिल्लोड, जि.औरगाबांद संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा: Nashik : CET, पुणे विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी

त्यानंतर त्यांना न्यायालयात हजार करून पोलीस रिमांड घेत त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा एकूण सहा गुन्ह्याची कबुली दिली. त्यात खेकडे येथून ६ जनावरे, वाघळी शिवारातून ४, न्हावेतुन ३, जावळे शिवारातून २, रोकडे फाटा येथून २ व पिंपळवाडी येथून ३ असे एकूण २० जनावरे चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर वरील आरोपीतांकडून ८ हजार रुपये रोकड व ५ लाख रुपये किंमतीची महिद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे.

त्यांची अधिक कसून चौकशी सुरु असून तालुक्यातील नागद, पिलखोड, हनुमंतखेडा व परिसरातील चोरी केल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी चोरी केलेल्या जनावरांचे विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दरम्यान त्यांचा अजून कसून तपास सुरु असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, पोउपनि लोकेश पवार, सफौ राजेद्र सांळुखे, सफौ अविनाष पाटील, पोहेकॉ युवराज नाईक, पोहेकॉ नितीन श्रीराम सोनवणे, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोहेकॉ कैलास पाटील, पोहेकॉ दिपक ठाकुर, पोना नितीन किसन आमोदकर, पोना शांताराम सिताराम पवार, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना संदिप ईश्वर पाटील, पोना भुपेश वंजारी, पोना संदिप माने, पोना ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना देविदास संतोष पाटील, पोना दिनेश विक्रम पाटील, पोना प्रेमसिंग नरसिंग राठोड, पोना विजय पाटील, पोना संदिप पाटील, पोकॉ हिराजी देशमुख, पोना नंदकुमार जगताप, मपोना मालती बच्छाव, व चालक सफौ अनिल आगोणे, पोना मनोहर पाटील आदींनी केली आहे.

आरोपीतांच्या शोधासाठी जातांना पोलिसांच्या गाडीला घडला अपघात

पोना नितीन आमोदक, पोना गोवर्धन बोरसे, पोना संदिप पाटील आदी (एम.एच. १९ सीझेड २२१२) या वाहनाने आरोपीतांच्या शोधासाठी जातांना सिल्लोडच्या अगोदर अपघात घडला.

गाडी अचानक पुलाखाली कोसळल्याने झालेल्या अपघातात पोना गोवर्धन बोरसे यांचा हात फॅक्चर होऊन मुका मार लागला. उर्वरितांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेने ग्रामीण पोलिसांत हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: लघुशंकेसाठी गेला अन्‌ दुचाकी चोरट्यांनी लांबविली

Web Title: Cattle Stealing Gang Busted 6 People Arrested Jalgaon Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..