Jalgaon News : राष्ट्रीय युवा संसदमध्ये युवकांना 1 ते 3 लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

national youth parliament

Jalgaon News : राष्ट्रीय युवा संसदमध्ये युवकांना 1 ते 3 लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी!

जळगाव : राज्यस्तरीय युवा संसदसाठी जळगाव जिल्ह्यात आयोजित स्पर्धेतून दोन तरुण व तरुणी निवडले जाणार असून, राज्यातून तीन युवा देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा ३ ते ७ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन होणार आहे. (chance for youth to win prizes of 1 to 3 lakhs in National Youth Parliament jalgaon news)

राष्ट्रीय युवा संसद २३ व २४ फेब्रुवारीला संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या युवकांना प्रवास भत्ता दिला जाणार आहे. विजेत्यांना प्रथम बक्षीस दोन लाख, द्वितीय दीड लाख, तृतीय बक्षीस एक लाख असणार आहे, अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी दिली.

युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून राष्ट्रीय युवा संसद घेण्यात येते. युवा संसदसाठी जिल्हा स्तरावर ऑनलाइन संसद होणार असून, जास्तीत जास्त युवक- युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. नरेंद्र यांनी केले.

राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्‍यक आहे. जळगाव जिल्ह्याची युवा संसद २७ आणि २९ जानेवारीला होणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : कजगावच्या युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्ह्यातील युवकांना जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा, रहिवासी दाखला, पासपोर्ट व फोटोसह आपले अर्ज नेहरू युवा केंद्र, प्लॉट ४०, गट नं. ६०, मानराज पार्क, द्रोपदीनगर, जळगाव या ठिकाणी २५ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहेत.

अधिक माहितीसाठी ०२५७-२९५१७५४ यावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा १८ ते २५ आहे. प्रत्येक सहभागी युवकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

जिल्हा आणि राज्यस्तरावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपला मुद्दा मांडता येणार असून, राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषा आवश्यक आहे. जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी चार मिनिटे वेळ मिळणार आहे. स्पर्धेसाठी विषय लवकरच कळविण्यात येतील.

हेही वाचा: Jalgaon Accident News : कुत्र्याला वाचवितांना रिक्षा उलटून 6 प्रवासी गंभीर जखमी

टॅग्स :JalgaonYouth