काकाच्या नावाने भामट्याने केली फसवणूक; वृद्धेला 18 हजाराचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Case News

काकाच्या नावाने भामट्याने केली फसवणूक; वृद्धेला 18 हजाराचा गंडा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : काकांनी बँकेत पैसे जमा करण्याचे सांगत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे अंदाजे २५ वर्षीय भामट्याने वृद्धेच्या घरात घुसून त्यांचा विश्वास संपादन करीत १८ हजारांची रोकड लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हातोहात फसवणाऱ्या अनोळखी भामट्याच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सायगाव (ता.चाळीसगाव) येथील शेतकरी अनिल केशव देवकर हे २२ मे रोजी पत्नी व मुलांसोबत येवला (जि. नाशिक) येथे लग्नाला गेलेले होते. त्यांच्या आई सायगावला घरी एकट्याच होत्या. दुपारी साडेबारा ते सव्वाच्या दरम्यान अंदाजे साडेपाच फूट उंची, वय २४ ते २५ वर्षे, रंग सावळा, शरीराने सडपातळ, अंगात फूल पॅन्ट व शर्ट, पायात चप्पल असलेला अनोळखी तरुण अनिल यांच्या घरी आला व त्यांच्या आईला ‘काका कुठे गेले आहेत’ असे विचारले. त्यावर ते लग्नाला येवला येथे गेल्याचे आईने सांगितल्यानंतर भामट्याने काकांनीच मला येवला येथून घरी पैसे घेण्यासाठी पाठवले आहे, हे पैसे बँकेत भरायला त्यांनी सांगितले असून मी पुन्हा सायंकाळी परत पैसे घेऊन येणार आहे. त्यावर देवकर यांच्या आईने त्याला नकार दिला. मात्र, त्याने देवकर यांच्या आईचा विश्‍वास संपादन करीत खाटेवर ठेवलेली त्यांची पिशवी झटकून चावी खाली पडली. त्याचवेळी देवकर यांच्या आईने चावी हिसकावली. मात्र, त्या भामट्याने मला अनिल काकांनीच पैसे घेण्यासाठी पाठवले आहे असे पुन्हा विश्वासाने पटवून दिले. त्याच्या बोलण्यावर देवकर यांच्या आईने विश्वास ठेवून लोखंडी पेटीचे कुलूप उघडले व त्यातील १८ हजार रुपये काढून त्या भामट्याकडे दिले. पैसे घेऊन तो भामटा सायंकाळी येतो असे सांगून निघून गेला.

हेही वाचा: 2 लाखांचे ठिबक सिंचनाचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास

काही वेळानंतर अनिल यांच्या आईने त्यांना फोन करून तू आपल्या घरी कोणाला पैसे घेण्यासाठी पाठवले होते का? असे विचारले असता, अनिल यांनी कोणालाच पाठवले नसल्याचे आईला सांगितले. दुपारी अनिल हे येवल्याहून सायगावला घरी आल्यानंतर पेटी पाहिली असता, त्यात १८ हजार रुपये नव्हते. पेटीतील कागदपत्रे देखील अस्ताव्यस्त केलेली होती. अनिल यांचे मूळ ओळखपत्र व आधारकार्डची साक्षांकीत प्रत देखील चोरीला गेल्याचे दिसून आले. घडलेला प्रकार अनिल देवकर यांनी मेहुणबारे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी अज्ञात भामट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: सफाईचा गंभीर प्रकार; चोकअप काढण्यासाठी कामगार उतरला गटारात

Web Title: Cheating Of 18 Thousand Rupees To An Old Man Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News
go to top