Shivsena MLA Disqualification : शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; ठाकरे गटाकडून तीव्र निषेध

विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे.
Shiv Sena Shinde group while welcoming the result given by the Speaker of the Legislative Assembly.
Condemnation of the verdict given by the Assembly Speaker.
Shiv Sena Shinde group while welcoming the result given by the Speaker of the Legislative Assembly. Condemnation of the verdict given by the Assembly Speaker. esakal

Shivsena MLA Disqualification : विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे. निकालाबाबत शिवसेना शिंदे गटाने पेढे वाटून जल्लोष केला. तर ठाकरे गटातर्फे या निकालाचा तीव्र निषेध करण्यात आला.

शिवसेना शिंदे गटातर्फे पद्मालय विश्रामगृहाबाहेर पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करीत जल्लोष करण्यात आला. जिल्हा प्रमुख नीलेश पाटील, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. (Cheers of Shiv Sena Shinde group and Strong protest from Thackeray group of result jalgaon news)

ठाकरे गटातर्फे निषेध

महापालिकेच्या इमारतीसमोर जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी प्रमुख गायत्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी दंडावर काळ्या फिती लावून निषेध केला.

अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील ,गायत्री सोनवणे, नीता संगोळे ,जया तिवारी, शारदा तायडे, श्रध्दा घोष, युवा सेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी, महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे ,समन्वयक महेश ठाकूर, विभाग प्रमुख किरण भावसार, पुनम राजपूत, ईश्वर राजपूत, शरीफ रंगरेज, नीलेश ठाकरे, शोएब खाटीक, संजय सांगळे, भारत भोईटे, राहुल पारचा ,बजरंग सपकाळे, इक्बाल शेख, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

ठरवून दिलेला निकाल

विष्णू भंगाळे (जिल्हा प्रमुख ठाकरे गट)- शिवसेनेबाबत विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी हा ठरवून दिलेला निकाल आहे. लोकशाहीचा गळा घोटला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत.

Shiv Sena Shinde group while welcoming the result given by the Speaker of the Legislative Assembly.
Condemnation of the verdict given by the Assembly Speaker.
Shivsena MLA Disqualification Result : सगळेच पात्र, पण सरशी शिंदेंचीच

मुख्यमंत्री शिंदेना जनतेचा आर्शिवाद

नीलेश पाटील (जिल्हा प्रमुख शिंदे गट):आमचा न्याय व्यवस्थेवर विश्‍वास असून आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रभूरामचंद्रांचे धनुष्यबाण आमच्याकडेच कायम राहिले आहे. ज्यांनी हिंदुत्व गहाण ठेवले त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची किंमत मोजावी लागली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जनतेची कामे करीत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा आर्शिवाद मिळाला आहे.

योग्य न्याय मिळाला

गुलाबराव पाटील (नेते शिंदे गट )- लोकशाहीत संख्येला महत्त्व असते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या अधिक असल्याने शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल लागला आहे. हा योग्य निकाल असून आम्हाला न्याय मिळालेला आहे.

बाळासाहेब दु:खी होतील

एकनाथ खडसे(आमदार,राष्ट्रवादी कॉंग्रेस)- विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अपेक्षितच होता, पक्षाच्या घटनेतील त्रुटी काढून शिंदे सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. या निकालामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात निश्‍चितच दुःख होईल.

Shiv Sena Shinde group while welcoming the result given by the Speaker of the Legislative Assembly.
Condemnation of the verdict given by the Assembly Speaker.
Shivsena MLA Disqualification: Rahul Narvekar यांच्या निकालावर Aditya Thackeray यांची प्रतिक्रिया

त्यांनी कष्ट घेऊन हा पक्ष उभा केला,आयुष्यभर मेहनत करून पक्ष उभा केला, अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केले. परंतु काल परवा आलेल्या लोकांनी हा पक्ष बळकावला, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आज निश्चितच अश्रू असतील.

निर्णयाबाबत समाधान

चिमणराव पाटील(आमदार,शिंदे गट):आपण व्यक्तिशः घेतलेली भूमिका ही योग्य होती आज या निर्णयाबाबत समाधान होत आहे. जनतेच्या कल्याणाच्या ,विकासाच्या दृष्टीने हे सरकार राहणे अत्यावश्यक होते. अशी लोकांची भूमिका होती. ती आज पूर्ण झाली .सत्ते परेशान होता है,मगर पराजित नही.

Shiv Sena Shinde group while welcoming the result given by the Speaker of the Legislative Assembly.
Condemnation of the verdict given by the Assembly Speaker.
Shivsena MLA Disqualification वर Sharad Pawar महत्वाचं बोलले | Eknath Shinde vs Uddhav Thackeray

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com