Jalgaon : होमवर्क केला नाही म्हणून मुलाला शर्ट काढून शिक्षा

teacher punishment
teacher punishmentesakal

जळगाव : दिलेला होमवर्क वेळेत पूर्ण केला नाही म्हणून ९ वर्षीय चिमुकल्याला शर्ट काढून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बळीरामपेठेतील एका खासगी क्लासमध्ये घडला. या प्रकरणी संबंधित क्लासच्या शिक्षिकेविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. बळीरामपेठेत पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गासाठी एक खासगी क्लास चालविला जातो. (child is punished by taking off his shirt for not doing his homework Nashik Latest Marathi News)

teacher punishment
सरस्वतीला आलेल्या पुराचा बळी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडला

या क्लासमध्ये अनेक मुले- मुली येतात. क्लासमधील एका मुलाने वेळेत होमवर्क पूर्ण केला नाही, म्हणून या क्लासमधील शिक्षिकेने त्या मुलास शर्ट काढायला लावला व त्यास मारहाण केली. हा प्रकार कुणीतरी मोबाईलमध्ये चित्रित केला.

त्यावरुन पीडित मुलाच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून क्लासमधील शिक्षिका पल्लवी जितेंद्र इंदाणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

teacher punishment
HPT, RYK महाविद्यालयात हाणामारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com