वादळात वीजतारा कोसळून विजेच्या धक्क्याने बालक ठार

वादळी पावसाचा रावेर परिसराला मोठा फटका
Child death
Child deathesakal
Updated on

सावदा (जि. जळगाव) : रावेर तालुक्यात बुधवारी (ता. ८) आलेल्या वादळी पावसाने खिरोदा, रोझोदा, सावखेडा, कुंभारखेडा परिसराला मोठा फटका बसला असून केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यातच वादळात खिरोदा येथे वीजतारा जमिनीवर पडल्याने विजेचा धक्का लागून साडेतीन वर्षाचा बालक ठार झाला. अफसर अजित तडवी असे मृत मुलाचे नाव आहे.

सावदा पोलिसात अफसर तडवी याचे वडील अजीज तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेघरवस्तीत घरासमोर असलेल्या वीज खांबांवरील प्रवाही तारा वादळाने तुटून जमिनीवर कोसळल्या होत्या. या वेळी अफसर तडवी हा बालक अंगणात खेळत असताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने अफसर जमिनीवर जमिनीवर कोसळला. या वेळी अफसरला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावातील डॉ.कोळंबे यांनी तपासणीअंती अफसर मृत असल्याचे जाहीर केले. घटनास्थळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, सावदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, सर्कल बंगाले यांनी पाहणी केली. रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, उपसरपंच सावखेडा अल्लादिन तडवी, महेंद्र पाटील, गौरखेडा ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांनी या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करून शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन तहसीलदार देवगुणे यांनी दिले. शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Child death
नवरा-बायकोसह नातेवाईकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
Child death
अखेर पत्नीचा संशय ठरला खरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com