Child Trafficking : ‘त्या’ बालकांना बिहार बाल कल्याण समितीकडेत्वरित पाठवा; मित्तल यांचे आदेश

child trafficking District Magistrate Mittal orders to send children to Bihar Child Welfare Committee immediately jalgaon crime news
child trafficking District Magistrate Mittal orders to send children to Bihar Child Welfare Committee immediately jalgaon crime newsesakal

Child Trafficking : भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी मौलाना अंजरसह २९ मुलांना ताब्यात घेतले होते.

या बालकांना बिहार बाल कल्याण समितीकडे त्वरित पाठवावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज दिले. (child trafficking District Magistrate Mittal orders to send children to Bihar Child Welfare Committee immediately jalgaon crime news)

भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी मौलाना अंजरसह २९ मुलांना ताब्यात घेऊन त्या बालकांना जळगावच्या बालकल्याण समितीकडे स्वाधीन केले होते, समितीने त्या बालकांची रवानगी बालसुधार गृहामध्ये केली होती.

सदर बालकांचा ताबा घेण्यासाठी त्यांचे पालक जळगावी आले असता बालकल्याण समितीने त्या बालकांचा ताबा दिला नसल्याने पालकांच्या वतीने जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे जळगाव जिल्हा मणियार बिरादरी या सामाजिक संघटनेतर्फे फारुक शेख यांनी अपील दाखल केले होते. जिल्हा दंडाधिकारी यांनी बाल कल्याण समिती समक्ष पालक व अर्जदार फारुक शेख यांची सुनावणी घेऊन त्या बालकांविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

child trafficking District Magistrate Mittal orders to send children to Bihar Child Welfare Committee immediately jalgaon crime news
Drug trafficking : डॉक्टर म्हणाले, ...तर गेला असता तस्कर महिलेचा जीव

त्या बालकांना घेऊन जाणाऱ्या मौलानाकडे आवश्यक ते सर्व संमती पत्रकसह मदरसा सांगलीचे पत्र असल्याने जिल्हा दंडाधिकारी यांनी या २९ बालकांचा ताबा त्वरित बालकल्याण समिती अररिया यांच्याकडे द्यावा, असे आदेश केले. स्वतः अररिया जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून पालकांना दिलासा दिला.

जिल्हादंडाधिकारी याच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातच जळगावचे सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख, फिरोज शेख, मझहरखान, अनिस शहा, मुजाहिद खान, मोहसीन युसूफ, अल्ताफ शेख, फझल कासार, समीर शेख, सय्यद अजहरसह भुसावळचे माजी नगरसेवक मुन्ना इब्राहिम तेली यांनी त्या सर्व पालकांना पेढे खाऊ घातले. पालकांनी जळगाव व भुसावळ येथील मुस्लिम मंचचे मुजाहिद शेख, फिरोज शेख, हाजी पिंजारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

child trafficking District Magistrate Mittal orders to send children to Bihar Child Welfare Committee immediately jalgaon crime news
Child Trafficking : मुलांच्या तस्करीप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com