Child Trafficking : मुलांच्या तस्करीप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

Suspect in child trafficking case remanded to judicial custody jalgaon crime news
Suspect in child trafficking case remanded to judicial custody jalgaon crime newsesakal

Child Trafficking : बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी अटकेत असलेला संशयित हजरत मौलाना मोहम्मद आलम यास रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Suspect in child trafficking case remanded to judicial custody jalgaon crime news)

दरम्यान, बिहारमध्ये गेलेल्या पथकाने संबंधित मुलांच्या पालकांसह संशयिताच्या घरी जाऊन चौकशी केली. दरम्यान, न्यायालयात संशयिताच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणात दोन पथके तयार करण्यात आली होती. त्यातील भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे हे बिहार राज्यातील अररियामधील जोकिहाट पोलिस (ओपी) अंतर्गत माहलगाव येथे तपासासाठी पोहचले. नंतर त्यांनी तेथील पोलिस अधीक्षकांची भेट घेतली व मदरशासंदर्भात विचारपूस केली.

दरम्यान, पथकाने गुन्ह्यातील संशयित हजरत मौलाना मोहम्मद आलम याच्या घरी जाऊन चौकशी केली. तसेच संशयिताने आणलेल्या २९ मुलांपैकी ९ मुलांच्या पालकांचे जबाब घेण्यात आले. तेथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांचाही जबाब घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Suspect in child trafficking case remanded to judicial custody jalgaon crime news
Drug trafficking : डॉक्टर म्हणाले, ...तर गेला असता तस्कर महिलेचा जीव

तर २९ मुलांच्या आधार कार्डबाबत सत्यता पडताळणी सुरू असून, मदरशाबाबत माहिती घेणे सुरू आहे. धर्मदाय आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक घेरडे यांनी सांगितले.

या संदर्भात मुस्लिम मंचतर्फे ॲड. इस्माईल शेख, ॲड. वसीम खान, ॲड. येतेश्याम मलिक यांनी न्यायालयासमोर संशयितांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर व्हॉट्सॲपवरील चुकीच्या संदेशावरून रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. के. मीना यांनी फिर्याद दिल्याचे सांगितले, तसेच मुलांची कागदपत्रे कायदेशीर बनविण्यात आली आहेत.

त्या नंतर ते प्रवास करीत होते. या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, असे न्यायालयासमोर सांगितले. तसेच दाखल गुन्ह्याबाबत औरंगाबाद खंडपीठात दोन - ते तीन दिवसांनंतर रीट पिटीशन दाखल करणार असून, जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे संशयिताच्या वकिलांनी सांगितले.

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने ते फेटाळून संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावली.

"मुले ज्या अवस्थेत आढळून आली, त्यानुसार ही कारवाई बरोबर असून, सखोल तपास करून पुरावे हस्तगत करणे सुरू आहे." - विजय घेरडे, लोहमार्ग पोलिस निरीक्षक, भुसावळ

Suspect in child trafficking case remanded to judicial custody jalgaon crime news
Jalgaon Crime: ऑनलाईन मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष देत मुलीवर अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com