आकाशवाणीतील सर्कल ‘नाकापेक्षा नथनी’ मोठी | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाशवाणीतील सर्कल ‘नाकापेक्षा नथनी’ मोठी...

जळगाव : आकाशवाणीतील सर्कल ‘नाकापेक्षा नथनी’ मोठी...

जळगाव : शहरातील महामार्गावरील आकाशवाणी चौकात सुरू असलेले रोटरी सर्कलचे काम म्हणजे ‘नाकापेक्षा नथनी मोठी’ असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत जळगाव जिल्हा जागृत जनमंचने खासदार उन्मेष पाटील यांना माहिती दिली असून येत्या दोन दिवसात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलाविण्याचे आश्‍वासन खासदारांनी दिले आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख लक्ष्मण होणार; सौरव गांगुली

शहरातील महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरण सुरू आहे. यात आकाशवाणी चौकात एकूण ३० मीटर रुंद हायवे. आणि मधेच ३० मीटर व्यासाचे सर्कल. म्हणजे नाकापेक्षा नथनी मोठी आहे. आधीचा हायवे सर्कलमुळे पूर्ण दाबला गेला. म्हणून वाहनधारकांना चौकाजवळील मजूर सोसायटीच्या पायऱ्यांना खेटून जावे लागत आहे. शहरातील कोणतेही रस्ते करणे म्हणजे रस्ते कमी अन्‌ वाद जास्त, असा अनुभव जळगावकर घेत आहे.

कोणीही यावे, कुठेही रस्ते बनवावे, कुठेही तोडफोड करावी, अशी स्थिती आहे. जागृत मंचतर्फे आमदार सुरेश भोळे, खासदार पाटील यांना आकाशवाणी चौकातील सर्कल लहान बनविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवराम पाटील, ईश्वर मोरे, अनिल नाटेकर, ॲड. भरत पाटील, राकेश वाघ आदींनी तेथील सुपरवायझर अभियंता गौकुळ राय यांच्याकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top