
जळगाव : येऊ द्या कोरोना, आम्ही मास्क लावणारच नाही
जळगाव : राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येऊन ठेपली आहे. जळगाव जिल्ह्यातील रोज नवे कोरेानाचे रुग्ण आढळत आहेत. असे असताना जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात येणारे ग्राहक मास्क (Mask) लावत नाहीतच, दुकानदारही मास्क लावत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढीसच लागणार आहे. दुकानदारांनी मास्क लावावा व ग्राहकांनाही मास्क लावण्यास सक्ती करावी अन्यथा दुकानदारांना दंडाची तरतूद आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, या कायद्यालाच अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेने तिलांजली दिली आहे.
जळगावकरांच्या निराळ्या तऱ्हा
महापालिका प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत नसल्याचे सर्वांचेच फावले आहे. कोणी मास्क लावत नाही, कोणी गर्दी करायचे टाळत नाही, वारंवार हात धूत नाही, असे चित्र आहे. जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढतील, जिल्हा प्रशासन लॉकडाऊनची घोषणा करेल, तेव्हा हेच व्यापारी, नागरिक त्याविरोधात उभे राहतील. एकीकडे नियम पाळायचे नाहीत, दुसरीकडे (lockdown) केले तर त्याविरोधात उभे रहायचे, अशी वृत्ती यानिमित्ताने दिसून येते.
हेही वाचा: सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे
दंड भरला पण मास्क लावला नाही
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ७३ नागरिकांकडून सुमारे ३६ लाख ३७ हजार २०० रुपयांची तर सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलेल्या ३४ हजार ३०२ व्यक्तींकडून जिल्ह्यात सुमारे १ कोटी ५२ लाख ३२ हजार ६२८ रुपयांची वसुली करण्यात आली. तर २ हजार ४९४ जणांवर कोविडचे गुन्हे दाखल करण्यात आले. असे असले तरी नियम मोडून दंड भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
हेही वाचा: आधारकार्ड अपडेट नसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात!
Web Title: Citizens Of Jalgaon Do Not Wear Masks Corona News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..