
जळगाव : आकाशवाणी चौकात 'RPF' जवानाला मारहाण
जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकात किरकोळ वादातून आरपीएफ जवानाला वाहनधारकाने दगडाने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन बसविण्यात येणार : मंत्री राजेश टोपे
धरणगाव तालुक्यातील रहिवासी मनोज गिरधर मोरे (वय ३७) यांची जळगाव येथे आरपीएफ रेल्वे पोलिस म्हणून ड्युटी आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता नोकरीवरून घरी जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले असताना त्याठिकाणी एक वाहनधारकाने धरणगाव येथे जात असल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित चारचाकी वाहनात बसले. त्यानंतर वाहनधारकाने अचानक ‘धरणगाव जात नाही’, असे सांगितले.
याबाबत वाहनधारकाला मनोज मोरे यांनी जाब विचारला, त्यावरुन वाद होउन दोघांत हमरीतुमरी झाली. वाहनधारकाने जवळील दगड उचलून मनोज मोरे यांच्या डोक्याला मारला यात ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी मनोज मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.
Web Title: City Of Jalgaon In All India Radio Chowk From Minor Disputes Rpf Jawan Stoned
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..