Latest Marathi News | 2 हजाराची लाच स्विकारतांना लिपिकास रंगेहाथ पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe crime

Bribe Case : 2 हजाराची लाच स्विकारतांना लिपिकास रंगेहाथ पकडले

नंदुरबार : महागाई भत्ता व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कमेचे बिल अदा करण्यासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी दोन हजाराची लाच स्वीकारताना नंदुरबार पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंद निकवाडे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता. १४) रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराचे शिक्षण विभागातील तीन टक्के महागाई भत्त्याचा फरकाची रक्कम काढून देण्यासाठी तीन हजार व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढण्यासाठी दोन हजार असे पाच हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते.(Clerk caught red handed while accepting bribe of two thousand Jalgaon News)

हेही वाचा: Agriculture Innovation : पिकांवरील फवारणीसाठी कृषी महाड्रोन ठरतोय वरदान

त्यापैकी आज दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ यांच्या पथकाने नंदुरबार पंचायत समिती आवारात सापळा रचला.

ठरल्यानुसार तक्रारदाराने आज पंचायत समिती शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंदा निकवाडे यास दोन हजाराची लाच देतांना पथकाने रंगेहाथ पकडले. या बाबत रात्री उशिरापर्यंत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

कारवाई पथकात हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, अमोल मराठे, मनोज अहिरे, देवराम गावित, महिला पोलिस नाईक ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, जितेंद्र महाले यांचा समावेश होता.

हेही वाचा: Jalgaon Crime Update : हॉटेल्स चोरट्यांचे लक्ष्य

टॅग्स :Jalgaoncrimebribe