
जळगाव : शहरातील द्वारकानगरातील तरुणाशी मोबाईलवर संवाद साधताना मालधक्क्यावरील कंत्राटदार संजू पटेल याने बौद्ध समाजाविषयी अक्षेपार्ह्य वक्तव्य केले. घडल्या प्रकाराची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर संशयिताला शहर पोलिसांनी सकाळीच अटक केली असून, समाजबांधवांनी गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. (Clip of slur against Buddhist community goes viral Offence against Maldhakka contractor Crime Latest Jalgaon News)
जळगाव शहरात दूध फेडरेशनमागील राजमालतीनगरातील संमिश्र वस्तीत संजू बिस्मिल्ला पटेल दोन- तीन भावंडाच्या खटल्यासह वास्तव्यास आहे. रेल्वे मालधक्क्यावर हमाल पुरविणे, रेशन मालाची ने-आण करण्यासह परिसरात बऱ्यापैकी दहशत या कुटुंबाने निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघा- तिघा भावंडानी एका घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण केली होती.
तेव्हाही गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आता चक्क मोबाईल संभाषणातून बौद्ध समाजाविषयी अक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, रतन गिते, तेजस मराठे, भास्कर ठाकरे यांनी संजू पटेल याला राजमालतीनगरातून अटक केली.
पोलिस ठाण्यात एकवटला जमाव
संजू पटेल याच्या जातीयवादी वक्तव्यामुळे संतप्त जमावाने शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी संबंधितांशी चर्चा केली व संशयितला अगोदरच पोलिसांनी अटक केल्याची माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परिसरात पटेलांची दहशत
दूध फेडरेशन, राजमालतीनगर, रेल्वे मालधक्का परिसरात माजी नगरसेवक राजू पटेल, त्याचा भाऊ संजू पटेल व त्यांच्या मुलांची प्रचंड दहशत आहे. गोरगरीब हमाल, मजुंरावर या लोकांचा दबदबा असून, यापूर्वीही सुरवाडे कुटुंबियांवर त्यांनी हल्ला चढविला होता. रेशनचा काळ्या बाजारात विक्री होणारा ट्रकभर तांदूळ जप्त करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.