Latest Marathi News | भरबाजारातील कापड दुकान फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : भरबाजारातील कापड दुकान फोडले

जळगाव : शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील बळिराम पेठेतील न्यू गोवर्धन कलेक्शन या कापड दुकान चोरट्यांनी फोडून ड्रॉवरमधील दीड लाखाची रोकड लांबवली. शहर पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कंवर नगर येथील राजा दयालदास पारवानी यांचे बळिराम पेठ भागातील संत कंवरराम मार्केट येथे न्यू गोवर्धन कलेक्शन नावाचे कापडाचे दुकान आहे. रविवार (ता. १८) सायंकाळी ७ वाजता पारवानी यांचा मुलगा पुलकित याने दुकान बंद केले. (Cloth shop in market broken Jalgaon News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Jalgaon News : जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच

मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉवरमध्ये ठेवलेली दीड लाखाची रोकड लांबविली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुरुदत्त टी सेंटरचे मालक संतोष गवळी यांनी राजा पारवानी यांना फोन करीत घरफोडी झाल्याची माहिती दिली.

चोरट्यांनी एक लाख ४५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे दिसून आले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर तपास करत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News | टोळी युद्धाचा भडका ; जळगावात तरुणाचा चॉपरने भोसकून खून